सोमवार, 7 दिसंबर 2015

अंजाम
-- संजय बोरुडे
मै  देख रहा हुं
ये मायुस बेबस और मरीदे  शहर ;
जिसके फौलादी शिकंजेमें
धधकते हुये दिलोंकी
अहमियत और कश्मकश
ललकार रही है ;
मानसिक प्रदुषनको ।

मै  देख रहा हुं ;
शहर कितने जलदीनमे है ।
उसे इतनी फुरसत कहा कि
वो देख सके;
गिलोतटीनपे कत्ल की गयी
छाटपटाती इन्सानियत
और प्रर्थानाघरोमे
दम तोडती हुई प्रर्थानाये ।
अब
शहर
बाद-दुआओकी
शिकस्तमे।
और
 मै
देख राहा हू ;
इस मायुस,बेबस
शहरका दर्दनाक

बुधवार, 22 अप्रैल 2015

एक अकस्मात घडून आलेली काव्यमैफिल..


                     (डावीकडून अशोक नायगावकर,डॉ. महेश केळुसकर ,साहेबराव,मी  तुकाराम धांडे )



                                             एक अकस्मात घडून आलेली काव्यमैफिल.. 
मी मुंबई विद्यापीठात पी एच. डी. च्या कामासाठी गेलेलो..फोर्ट मधील काम आटोपल्यावर मी केळुस्करांना फोन केला. ते म्हणाले ,'अरे,मुंबईत आलायस का?' मी हो म्हणताच ते म्हणाले.. ,'आता नको  कर,संध्याकाळी सात पर्यंत वाशीच्या नाट्यगृहात पोहोच.राजकीय विडंबने  दोन तयार  ठेव..' मी हो म्हटले खरे पण राजकीय कवितांसाठी  प्रसिद्ध असलो तरी  विडंबने  ? फक्त तीन तास हातात उरलेले.  जेवण राहिलेले.. 
  वाशी  स्टेशनवर उतरलो तर अर्धा तास झालेला.. तोपर्यंत मुखडा सुचला होता.. समोर महेशजी दिसले..मग एकाच रिक्षातून जाताना मी त्यांना मुखडा ऐकवला. वामनदादांच्या एका गीताच्या चालीवर.. त्यांना तो आवडला.ते म्हणाले,'मी शेवटी नाव घेतो तुझे..तोपर्यंत तयार कर 'त्यांनी प्रोत्साहन दिले खरे पण मला टेन्शन  आलेले.कार्यक्रम मोठा होता.नवी मुंबई प्रेस क्लबने कोजागिरी निमित्त ठेवलेला. नायगावकर,साहेबराव ठाणगे,तुकाराम धांडे सगळे स्टेजच्या मागे तयार होऊन बसलेले.. अनेक कार्यक्रमात एकत्र असल्याने ते माझ्या बाबत कॉन्फिडन्ट होते.स्टेजवर गेल्यावर भर एसीत मला घाम फुटला..काही सुचायलाच तयार नाही.कुठून कार्यक्रमाला हो म्हटले असे झालेले..  एक शिवरायांवरची माझी गाजलेली   कविता होतीच.पण पहिल्या राउन्डला विडंबन हवे होते..मला तर काही सुचेना. त्यात तिथे कागदही नव्हता.. म्हणजे मनात करावी लागणार.त्यात अन्य कवींच्या कविता चालू झालेल्या .. 
               पहिल्या राउन्डच्या शेवटी माझे नाव पुकारले..केळुस्करांनी प्रस्तावनाही  दणकेबाज केली..अनुवादक,समीक्षक वगैरे..   मी उठलो..,आवाज लावला... आणि सुरु केले... 
'पहा गड्यानो ,निवडणुकीचा मोसम आलाय खरा... हे.. मोसम आलाय खरा,पुन्हा मलाच मतदान करा.. '
आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.. मग मी माझ्या नेहमीच्या मूड मध्ये परतलो .. आणि केळुसकरांनी टाकलेला विश्वासाला मी पात्र ठरल्याची पावती त्यांच्या चेहऱ्यावर दिसली.. अशा रीतीने मी वेळ मारून नेली..पण कुणाला संशय हि आला नाही कि मी ऑन सतेज कविता तयार केली म्हणून... 

- डॉ .संजय बोरुडे