मंगलवार, 31 मार्च 2020

कविचं पोस्टमार्टेम - संजय चौधरी

 


 (संग्रह येण्याच्या आधी ज्यांच्या कविता रसिकांच्या तोंडपाठ होत्या,असा कवी म्हणजे संजय चौधरी.'गंगेवरची  म्हातारी','घावांचे गाव','मला जर मुलगी झाली तर तिचे नाव सीता ठेवणार नाही','एकदा पावूस दंगलीत सापडला' ,'जे व्यासपीठावर असतात..'अशा अनेक कविता रसिकांच्या पाठ आहेत आणि होत्या.'आभाराचा  भार कशाला,आता फुलांचा हार कशाला?' ही तर महाराष्ट्रात सर्वदूर पोचलेली कविता आभार प्रदर्शनात भेटते. मध्यंतरीच्या कालखंडात कवितेवर आलेली  सूज पाहून,जाकिटे घालून पाकिटे मिळवणारी मद्योन्मत्त कवींची जमात पाहून आपल्या मनातली सल त्यानी या मालिकेतून सही पकडली.त्यामुळेच या कविताने मोठी खळबळ माजवली,त्यातल्या तीन कविता येथे देत आहोत.त्यांनी स्वत:च आजचा ब्लॉग लिहिला आहे.धन्यवाद.-संपादक,साहित्याक्षर )

कविचं पोस्टमार्टेम - संजय चौधरी


          "कविचं पोस्टमार्टेम" या शीर्षकानं मी मालिका कविता लिहीली आहे, अकरा तुकडे लिहून झालेत.अजून लिहितो आहे. हे खरं तर कुठल्याही कविनं केलेलं आत्मपरीक्षण ठरावं. कवितेचं ज्या पद्धतीनं अवमूल्यन होत आहे. कवितेच्या नावाखाली कवितेसारखं दिसणारं पण कविता नसलेलं असं आजूबाजूला खूप दिसतं.  खरी कविता वाचायला मिळणं दुर्मिळ झालं आहे. कविते पासून मिळणा-या फायद्यासाठी सगळा आटापिटा चाललेला आहे असं वाटतं. कवितेचे कार्यक्रम, मानधनं, प्रसिध्दी,पुरस्कार  ... त्यासाठी चाललेलं लांगुलचालन, कंपूशाही, विशिष्ट लोकांची मक्तेदारी या सगळ्या साहित्यातल्या प्रदूषणानं कुठलाही संवेदनशील माणूस व्यथित झाल्याशिवाय राहणार नाही. हेच कवितेत मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. कविच्या आत चाललेला हा एक प्रकारचा झगडा आहे. ख-या कविते पासून दूर चाललेल्या कविसोबत हा कवितेतून केलेला संवाद आहे. ही काही कुणावर केलेली वैयक्तिक टीका नाही.कुणा कविला किंवा कविच्या समूहाला उद्देशून या कविता नाहीत. हे कविचं स्वत:चं असं आक्रंदन आहे. सभोवती ज्यांना अजून कविताच सापडलेली नाही पण जे महाकवीच्या आविर्भावात वावरत असतात.ज्यांच्यासाठी मी "महाकवीचा मास्क लावलेले" असा शब्दप्रयोग कविच्या पोस्टमार्टेम मधल्या कवितेत केला आहे.असे तथाकथित भुस्सा भरलेले कितीतरी कवी आसपास दिसतात. कवितेचं एकूणच वातावरण ज्यांनी नासवलं आहे. त्यामुळे कवितेच्या रसिकांची कवितेची अभिरूची देखील बिघडलेली आहे.
            कविता अधिकाधिक नितळ असावी, निखळ असावी,अस्सल असावी. यासाठी हा प्रयत्न आहे.तूर्त त्यातील तीन तुकडे आपल्यासाठी इथे देत आहे.
- संजय चौधरी, नाशिक

********************************

# कविचे पोस्टमार्टेम- एक #  

कवीच्या मनात त्यानं मांडलेलं असतं 

दु:खाचं दुकान 
जखमावरच्या खपल्या सतत काढून 
जखमा ताज्या ठेवायला आवडतं कवीला 

कवी करतो भांडवल 

सगळ्या जगाच्या दु:खाचं
आई बापाला सुध्दा सोडत नाही कवी 
आईच्या कष्टावर मोठ्या पोटतिडकीनं लिहितो कविता
पण तिच्या वाट्याला सुखाचे दोन घास यावे यासाठी 
आपले बूड हलवत नाही कवी 

कवी दुष्काळावर लिहितो 

डोळ्यातून पाणी काढणा-या कविता 
डोक्यावर हंडाकळशी घेऊन मैलोनमैल् फुफाट्याची वाट तुडवणा-या मायबहिणींवर 
आणि 
संध्याकाळी बसतो बारमधे बिअर ढोसत 
सोबत बापाच्या अविरत कष्टावरच्या कवितांचा चखणा घेऊन

कवी वर्षानुवर्षे गिरवतो त्याच त्या कविता 

आणि कवी संमेलनं करत हिंडत राहतो  
खुर्द-बुद्रूक मधे 
घरी बायको रेशनच्या दुकानासमोर उभी असते रांगेत आणि कवी बरळत असतो 
जग बिग बदलण्याच्या षंढ गोष्टी 

दु:खाला दूर भिरकावून मायबापाला आणि बायकापोरांना सुखाचे चार क्षण देण्याची धमक नसते छकडक कवीत 


कवी लिहितो शिवाजी महाराजांवर आणि जगण्यातल्या अफजलखानाशी दोन हात करण्याची नसते त्याची तयारी

कवी लिहितो, बाबासाहेबांवर दाद घेणा-या कविता 
त्यानं वाचलेला नसतो एखादा परिच्छेद 
बाबासाहेबांच्या घटनेतला

कवी दु:ख चिवडतो चिवडतो ... चिवडत राहतो

आणि निघून जातो इकडची काडी तिकडे न करता ... या ग्रहावरून 

कवीनं दिलेला असतो शब्दांचा ॲनेस्थेशिया 

स्वतःला आणि भोवतीच्या जगालाही 
✍️✍️✍️#######################################

संजय चौधरी
# कविचं पोस्टमार्टेम - दोन #

कविचा होत जातो साचा 
कमी होत जाते हळूहळू त्याच्यातली लवचिकता
कवि लिहित राहतो तेच तेच, परत परत, आलटून पालटून 
त्याचे पुढचे संग्रह म्हणजे मागच्या संग्रहाचीच पुढची पानं 
कवी स्वतःच्याच प्रतिबिंबात अडकून पडलेला
कवि फोडत नाही चेह-यावरचा मास्क 

आता लहान मुलासारखं

हमसून हमसून कुठं रडता येतं कविला ?
आणि हसताही येत नाही खळखळून किंवा सातमजली

कविला पडत नाहीत कोरी करकरीत स्वप्ने

कविचं भाबडेपण हरवून जातं मागच्या वळणावर ... घुंगरातल्या खड्यासारखं

कवि आजन्म कैद ... त्याच्याच कवितेत

कवि गजाआड ... स्वतःच्याच प्रतिमेच्या

निसटतं कवितेचं बोट त्याच्या लिहित्या हातातून 

कधी कविताच नकळत सोडून देते त्याचा हात 
... होते परागंदा 
कवि फिरत राहतो पत्ता हरवलेल्या लहान मुलासारखा ... त्याच त्याच गल्ल्यांमधून 
पण पोहोचत नाही मुक्कामाला 

कविला खरोखरंच माहित नसते 

आता तो कवि न उरल्याचं आणि
कुणी सांगत ही नाही त्याला समोर बसवून 

काय लिहिण्यासाठी 

झाला होता आपला जन्म
हेच कवि विसरून गेलेला

कविला आरसा दाखवला पाहिजे 

आता कविला खरोखरंच आरसा दाखवला पाहिजे 
कराल तुम्ही माझं हे छोटंसं काम ?

✍️✍️✍️#############################################


 # कवीचे पोस्टमार्टेम - तीन #

कवी कविता लिहित नसतो
तर तो जे लिहितो 
त्याला कविता म्हणत असतो ब-याचदा

कवी वर्षानुवर्षे लिहितो तशीच कविता ...

कवितेला निर्मिती म्हणतात हे त्याला सांगितलेलंच नसतं कुणी
मिळवतो फुटकळ कविसंमेलनाची निमंत्रणं
लोकल पेपर मधे छापवून आणतो 
त्याची हसरी छबी 

कवी प्रकाशित करतो कवितासंग्रह एकामागोमाग एक

डुकरिणीच्या पिलांसारखे भसाभसा
गल्लीबोळातल्या फुटकळ प्रकाशकाला हाताशी धरून 
कवी हे विसरून गेलेला की ,
खरा कवी नसतो कधीच पुस्तकात बंदिस्त
तो तर ओळी होऊन वसती करतो लोकांच्या ओठांवर 
काळाच्या काळजात झुलत असतात 
ख-याखु-या कवितांची घरटी ... शतकानुशतकं 
आपल्या पक्ष्यांची वाट पहात 

कवी मांडतो त्याला मिळालेली स्मृतीचिन्हे दिवाणखान्यात परमवीरचक्र मिळाल्यासारखे

मात्र कवीला मिळालेल्या मोमेन्टोज् ला विचारत नाही 
रस्त्यावरचं काळं कुत्रंसुध्दा
येत नाहीत साधे मूठभर खारे शेंगदाणे त्याच्या बदल्यात जगातल्या कुठल्याही बाजारात 

तरीही शतकांपासून लिहितो आहे कवी आणि लिहितच राहील 

एकटाच 
गच्च काळोखात
सूर्य विझल्यानंतरही 
... कुठल्याही काळात 
✍️✍️✍️####################################################

संपर्क :९३७०११६६६५ 


संजय चौधरी आणि डॉ.संजय बोरुडे 


सोमवार, 30 मार्च 2020

आठवें रंग का गुब्बारा -व्यक्तिवाद की सीमाये लांघनेवाली कविता

             


                 
(विशाल  अंधारे,लातूर  यांच्या  'आठवें रंग का गुब्बारा' या हिंदी काव्यसंग्रहावर 'साहित्यनामा' या हिंदी अंकात आलेला  रचना यांचा समीक्षालेख.साभार .-संपादक ,साहित्याक्षर  )


आठवें रंग का गुब्बारा -व्यक्तिवाद की सीमाये लांघनेवाली कविता

कविताएँ मन का सहजभाव होती है। कवि की गहरी सोच आला की तड़प न ,वेदनाओं की गर्जन, शब्दों में बांधकर पाठक के मन में उतरती है।कवि के मन में मची हलचल, अस्वस्थता से बने सहजभाव कविता का अभिन्न अंग होता है आंखों से देखा कानों से सुना शरीर को बेदखल करते हुए मन ने महसूस किया भाव शब्दों की सार्थकता के साथ कागज़ पर उतर आती है तो कविताएं बनती है

नर और नारी के भेद नष्ट किए हुए शब्दों का रुप धारण किए कविता एक जन्मजात शिशु की तरह कवि के मन में प्रसव पाती है कविता का यह प्रसव कवि के लिए अपने आप में एक चुनौती होती है संवेदनक्षम मन भवताल में घटनाओं से चोट खाता है वेदनांकीत होता है तो कवि आनंदविभोर होता है इन सारी अवस्था में प्रकृती का पुरुष या स्त्रि होते हुए भी तटस्थता के साथ संवेदनक्षम मन कविताओं जन्म देता है

महाराष्ट्र के विशाल अंधारे की कविता कुछ इसी तरह मन के भावों को सहज रुप में पाठक को मिलती हैं किसी मुख्य विषय को अपना लक्ष्य ऩ बनाते हुए आठवें रंग का गुब्बारा के माध्यम से

विशाल जी की कविता पाठक को अस्वस्थ कर देती है कविताओं के हिसाब से सृजन कृती का शीर्षक साथ है सात रंगों से भरी इस प्रकृती में मनुष्य के मन में उभरने वाले न सहजभाव वही आंठवे रंग का गुब्बारा होता है इसी रंग को समेटते हुए आंठवे रंग का गुब्बारा विशाल जी ने पाठक के हाथ थमा दिया इस क़िताब की मुखपृष्ठ पर इंद्रधनुष के साथ आठ गुब्बारे का चित्र है । आंठवे रंग का गुब्बारा सबसे बड़ा गुब्बारा है ।बादल के रंग से रंगा यह आंठवा गुब्बारा मनुष्य के मन की अस्वस्थता खालीपन ओर मन संवेदना के कारण प्रतिक्षिप्त क्रिया प्रतिक्रिया के रूप में साकार करता है मुखपृष्ठ के बाद पहले ही पन्नें पर कवि विशाल जी अपने मन की पारदर्शिता को प्रकट करते है  -

मैं एक सच हूं
कितना भी कुरेदो मुझे
मैं झूठ नहीं बन सकता।

कवि का स्वंय प्रति यह अटल विश्वास विचारों की उंचाई बढ़ाता है कोलकाता के अॅब्स पब्लिकेशन के द्वारा यह इस किताब की उपलब्धी पर कवि को बधाई और ढ़ेर सारी शुभकामनाएं।

इस किताब का समर्पण सृजन की धारा को आगे बढ़ाता है मनुष्य के मन की भावनाओं को अभिव्यक्त करने वाले शब्दों को यह कविता की किताब समर्पित है ।यह एक गौरवशाली विचारों की परंपरा है।
जिसे आगे बढ़ाते कवि विशाल जी कहते हैं -

मेरे शब्दों में बसे
आंठवे रंग को समर्पित

अपने कविता के प्रति कवि की भुमिका भी निसंदेह विचारों की प्ररेणा देनेवाली है निसर्ग के प्रती तरल अनुभव बताते हुए उत्कट प्रेमानुभव उत्कट देहानुभव के साथ अतित संवेदन प्रकट करते हुए। कवि अपने शब्दों के जरिए कहते हैं

आठवें रंग का गुब्बारा
कोई शोर था
जो दिल में दबकर
दस्तक दे रहा था।

 कविता मन के भावना का अविष्कृत रुप है। फिर भी कविता का सृजन सहज नहीं है कविता का सृजन एक अंतरिक संघर्ष है ।यही बात विशाल जी प्रभावशाली शब्दों में अभिव्यक्त करते हैं यह समर्पण क़िताब में सारी प्रविष्ट कविता में भावनाओं का सम्मान है साथ में ही कवि का ये आंठवा रंग एक ऐसी भाषा का रंग है जो इंद्रधनुष के उन पंरपरागत रंगों से तालमेल बैठाते हुए समाज के एक चेहरे का एक नया रंग प्रस्तूत करने की कोशिश की है ये कहना उचित है।

इस किताब को डाॅ प्रियांका सोनी अध्यक्ष अम्रतधारा फाऊंडेशन जो वरिष्ठ साहित्यकारा के साथ समाजसेवीका भी है इनकी
प्रस्तावना प्राप्त है तो महाराष्ट्र के वरिष्ठ साहित्यकार डॉ नागनाथ कोतापल्ले जी का आशिर्वचन प्राप्त है साथ ही में डाॅ पल्लवी परुलेकर, गजानन तुपे, पवन तिवारी संजय द्विवेदी आदी महानुभावो की शुभकामनाएं मिली है।

इस किताब में प्रविष्ट कविताओं को पाठक तीन अंगों से महसूस करता है।सबसे पहला है प्रेम कविता दुसरा सामाजिक कविताएं और तिसरा समाज के प्रतिबिंब का दर्शन कराते मन का खालीपन महसूस करने पर मजबूर करने वाली कविताएं ।इसका अर्थ बिल्कुल सरल है कवि स्व से समाज की और अपनी कविताओं की यात्रा करवाता है।प्रेम कविताओं में एक प्रेमी प्रेम के साथ विरह, सौंदर्य रोजाना जिंदगी की बिती खालीपन,
फुलना मिलन इन एहसासों के साथ

पाठक प्रेम की नई रीत सिखाती है प्रेम कविताओं में मुख्यत निली आंखोंवाली लड़की, तीन खत, तस्वीरें ,नज्में, किताब,प्रेम का मधूर धागा, उलझी पड़ी नज्म,धर्म की लाली,सुखी बरसात,गुलाबी निशान,चाय,तुम्हारा रुकना, तुम्हारे लौटने का ख्वाब,प्रेम मिलन आदी कविताएं हैं।

नीली आंखों वाली लड़की प्रेम कविता होते हुए भी बचपन जगाने वाली कविता है रोजाना जिंदगी जिते समय वक्त गुजर जाता है लेकिन दिल कोशिश में डूबा रहता है हाथों से निकल गये प्रेम में इंतजार का एहसास देनेवाली यह कविता समय के फलक पर प्रेम के निशान छोड़ देती है।

तीन खत इस कविता में तुम्हारा होना ही पढूंगा तुम्हारा होना ही मैं फिर से जीना चाहता हूं आशावाद से भरा प्रेम पहले दोनों ही चिठ्ठीयों को नकारकर आखरी चिट्ठी को अपनाना चाहता है।कविताओं में अलग अजीब सी कसक पाठक को छू जाती है चेहरे पर रौनक सी भरकर होंठों पर मुस्कुराहट छोड़ जाती हैं ।कम शब्द में अर्थ की गहराई समेटकर कविता में उतारना विशालजी का  स्वभाव है ।धर्म जाति में बटां प्रेम प्रेमीयों को अक्सर जान गंवानी पड़ती है इसी बात को विशाल जी अपने शब्दों में कहते हैं -
बस इस प्रेम के पल को
जिने के लिए
उन्होंने अपनी जान दी
तो देनी पड़ी थी
राह देखते प्रेमी के आशावाद जानेवाली- उम्मीद- कविता जताती है प्रेम को अभिव्यक्त करने की विशाल जी अलग ढंग से कविता में उतारते हैं..

जो तुम्हारे होठों पर रुका था
और उसे अम्रुत समझकर पी गया था मैं । शाश्र्वत प्रेम को कविता का अंग जाता है।प्रेम कविताओं की तरह सामाजिक कविताएं भी विषेश रूप से पाठक को आकर्षित करती है । कलाकार हमेशा संवेदना दुख दर्द आतंक को अपने सृजन से अभिव्यक्त करता है सामाजिक कविताएं में भी पकड़ने वाली बाजारवाली गली , पोशाक,वासना का कुढ़ा, सिंदूरी श्रृंगार , पुरुष,धर्म की लाली, आजादी आदी कविताएं इस किताब में विशाल जी की है।बाजारु औरतों का सस्तापन कवि अपने शब्दों में सार्थ शब्दों में बयान करता है उसकी  मजबूरी को नजरअंदाज करता है -

एक ओ खुली थी
एक किताब की तरह -
बुकस्टाल पर खरीदकर 
कोई भी पढले उसे

समाज की औरतों की ओर देखने की द्रष्टी एक वस्तू के समान होती है वस्तू से बढ़कर कोई किमत पुरुष के नजरों में नहीं होती वस्तु की बजाय उसकी उपयुक्तता देखी जाती है औरत की जिंदगी भी बुक की तरहां ही होती है यह भयान वास्तव वासना का कुढ़ा इस कविता में प्रतित होता है
इस किताब में खिलौना ओर दुसरी औरत बिलकुल अलग सोच और अंदाज से आई है इस तरह की शायद ही किसी भाषा में होगी कविताएं अक्सर अपना दर्द अभिव्यक्त करने में सफलता पाती हैं लेकिन अपनी मां का दुख जानते हुए भी औरत का दुख जानना यह बात वैश्वीक विचारों को संपन्न करने वाली है
इसी बात को विशाल जी कहते हैं-
बहुत से दुख
मां के पहलू में
होकर भी मेरी नजरों से
हटी नहीं 
वो दुसरी औरत
मनुष्य के जीवन में हर तरह के रिश्ते सामील होते हैं ।हर रिश्ते की अहमियत अलग होती है उसी तरह हर रिश्ते का सुख दुख बंधक अलग होता है कुछ बातें सारे रिश्ते नाते होते हुए भी खालीपन जगाती हैं । रिश्तों में अकेलापन आ जाता है यादों के निशान जिंदगी में रह जाते हैं।
लेकिन अपने दुर निकल चुके होते है। ऐसी भी कुछ कविताएं विशाल जी लिखते है ख़ोज,बांज, मां की पुकार, अधूरा ख्वाब,सुखापन ,गहरी नींद ,टेप रेकार्डर जैसी कविताएं रिश्तों की असफलता सामने लाती है।

विशाल जी की कुछ कविताएं उन्हें कविता के दुनिया का सरताज पहनाती है बुद्ध, पुरुष,वो दुसरी औरत जैसी कविताएं वैश्विकता का महान संदेश देकर व्यक्तिवाद की सिमा पार कर जाती है ।

हिंदी साहित्यकार कहते हैं की कोई किताब पहली नजर में शिर्षक से ही पाठक को आकर्षित करले और अपनी विषयवस्तु चलते पढ़ने को बाध्य करे ऐसी विशाल अंधारेजी की किताब है।अंतरमन और प्रकृती और मनुष्य के भावों को कविता जिंदा कर देती है। साथ ही कविता किताब बेमिसाल है।कवि को ढेर सारी शुभकामनाएं।कवि कलम वैश्विकता से जुड़ी रहें।इसी कामना के साथ किताब की आलोचना बड़े हर्ष से विराम देती हुं।

- रचना ,७०६६३०१९४६

कवी विशाल अंधारे -९८६०८२४८६८ 

रविवार, 29 मार्च 2020

उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली




                           उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली - डॉ.संजय बोरुडे 









     

                                  

                               

         प्रा.डॉ.शैलेश त्रिभुवन हे संपादित करत असलेल्या 'सक्षम समीक्षा' या त्रैमासिकाच्या ऑ.नो.डी.२०१९ च्या अंकात (ताज्या) डॉ.संजय बोरुडे यांनी लिहिलेला  'उदाहरणार्थ नामुष्कीचे स्वगत : पठारी शैली ' हा शैली वैज्ञानिक समीक्षालेख प्रकाशित झाला आहे.नगर जिल्ह्यातले पहिले साहित्य अकादमी विजेते लेखक म्हणजे प्रा.रंगनाथ पठारे म्हणजे समीक्षाकाना दमवणारे लेखक म्हणून परिचित आहेत.त्यांच्या शैलीचे अंतरंग उलगडवून दाखवणारा मराठीतील कदाचित पहिलाच लेख आहे.मा.संपादक,सक्षम समीक्षा यांच्या परवानगीने प्रकाशित करत आहोत.धन्यवाद.
-- संपादक,साहित्याक्षर 

शुक्रवार, 27 मार्च 2020

नवा आश्वासक समीक्षा ग्रंथ - डॉ.अरुण ठोके,नाशिक


       
         ‘स्री जाणीवा आणि स्री संवेदना: एक अभ्यास’– नवा आश्वासक समीक्षा ग्रंथ
                   
                                              - डॉ.अरुण शिवाजी ठोके
(मराठी विभाग प्रमुख,के. के. वाघ कला, वाणिज्य विज्ञानआणि संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी,ता. निफाड,जि. नाशिक E mail- arunthoke26@gmail.com
मोबा-९१७५१६४७९९)

                                                               प्रस्तावना:

स्री जाणीवा आणि स्री संवेदना: एकअभ्यास’ (निवडक कवयित्रींच्या आधारे) या समीक्षात्मक ग्रंथाचे साहित्याक्षर प्रकाशन संस्थेकडून नुकतेच प्रकाशन झालेले आहे. प्रस्तुत ग्रंथात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतांतील समकालीन कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा आशय व अभिव्यक्ती या दोन अंगांनी स्री जाणीवा व स्री संवेदनांसंदर्भात विचार करण्यात आलेला आहे. स्री जाणीवा समृध्द करणाऱ्या आशयसूत्रांचा शोध घेणे यासाठी समाजाशास्रीय, मानसशास्रीय व आदिबंधात्मक या समीक्षा पद्धतींचाअवलंब करण्याचा प्रयत्न रचना यांनी केलेला आहे.
         आपल्या समाजात स्रीला दुय्यम मानण्याच्या धारणेमुळे रूढ झालेल्या परंपरांमुळे स्त्रियांच्या अभिव्यक्तीला फारसा वाव नव्हता. किंबहुना संत कवितेच्या परंपरेतही पुरुषांच्या तुलनेने कवयित्रींची संख्या फार कमी होती. ज्या संत कवयित्रींनी कविता लिहिल्या त्यांना फार कष्ट सोसावे लागले. संतकवयित्री जनाबाई, कान्होपात्रा व संत बहिणाबाई यांची उदाहरणे सांगता येतील. तरीही तत्कालीन समाजाला पुरोगामी दृष्टीकोन बहाल करण्याचे काम या कवयित्रींनी केले.
       आधुनिक काळात मराठी कवितेत क्रांती झाली. केशवसुत ते मर्ढेकरी कविता,मर्ढेकरी  कविताते साठोत्तरी कविता ही मराठी कवितेची वेधक वळणे आहेत. या वळणांवरही बोटावर मोजण्याइतक्याच कवयित्रींची कविता पुढे आली. स्रीवादी चळवळीच्या प्रभावातून स्रिया स्री जाणीवेच्या स्वतंत्र कविता लिहू लागल्या. ऐंशीच्या दशकात कवयित्रींच्या संख्येत बरीच वाढ झाली. नव्वदोत्तर काळात स्री जाणिवांचे प्रकटीकरण करणाऱ्या कवयित्रींची संख्या लक्षणीय आहे. आपल्याच  काळात लिहिणाऱ्या प्रथितयश व नवोदित कवयित्रींच्या कवितांची दखल घेवूनत्यावर साधक बाधक चिंतन करण्यातून प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती झालेली आहे.
     हा समीक्षाग्रंथ स्रीला‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला अर्पण करण्यात आलेला आहे. म्हणजेच रचना यांची भूमिका ही माणूसकेंद्री आहे. माणूस उभा करण्याचे, त्याच्या सृजनावर भाष्य करण्याचे, त्याला प्रेरित करून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम करणे म्हणजे समीक्षा करणे होय. हे ज्यांना कळाले आहे त्या रचना यांचे लेखन अभिनंदनाला पात्र आहे.
         या ग्रंथात एकूण १७ प्रकरणे असून सुमारे १५ कवयित्रींच्या प्रत्येकी १० निवडक कवितांचा म्हणजे सुमारे १५० कवितांचा विचार करण्यात आलेला आहे. या ग्रंथात नव्वदोत्तर स्रीकवयित्रींच्याकवितांचा प्रामुख्याने विचार केल्याने या अभ्यासाला नव्वदोत्तर कालखंडाचे संदर्भ प्राप्त झालेले आहेत. स्रीवादी चळवळीमुळे पाश्चात्य जीवनव्यवहार व साहित्यव्यवहारात परिवर्तन घडून आल्याचे निरीक्षण रचना यांनी प्रास्ताविकात नोंदविले आहे. या ग्रंथावर भाष्य करतांना त्यातील कवयित्रींच्या कवितांबाबत काही स्वतंत्र निरीक्षणे या ठिकाणी नोंदविण्यात आलेली आहेत.
            डॉ. भाग्यश्री यशवंत यांच्या कवितांचे नेटके विवेचन करून रचना यांनी ठळक विशेष नोंदवले आहेत. सन १९९० नंतर वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात नवीन शोध लागले. हे नवीन शोधच स्रीभ्रुणहत्येस कारणीभूत ठरले. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले. एकीकडे मुलगी जन्माला येवू नये असे वाटणे व पुढे त्याच मुलीच्या पोटी वंशवेल वाढण्याची अपेक्षा करणे या दुटप्पी सामाजिक भूमिकेचा पर्दाफाश डॉ. भाग्यश्री यशवंत यांनीकेलेला आहे. हे वास्तव रचना यांनी उलगडवून सांगितले आहे. तसेच भाग्यश्रींच्याकवितांतून तारुण्यात सुखी संसाराची स्वप्नेरंगविणाऱ्यामुलीच्या विवाहानंतर झालेल्या अपेक्षाभंगाचीदुखरी जाणीव सूचकतेने व्यक्त झालेली आहे. स्रीच्या वाट्याला आलेले अनेक भोग तिच्या घालमेलीचे अनुभव, त्यातच तिचे तुटत जाणे तरीही संसाराशी एकात्म होत त्यातच आपल्या जीवनाचे सार्थक शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे, चाळीशीनंतरच्या शरीर-मानसिकबदलांचीहोणारी घालमेल, सासू-सुनेचा संघर्ष व शेवटी सहन करणं ही बाईची प्रकृती आहे. तिच्या सहन करण्यातफक्त बाईपण हेच मुळ आहे याविचारसूत्राच्या आधारे त्यांच्या कवितांचे विश्लेषण  नेमकेपणाने केलेले आहे.
             श्रीमती वैशाली मोहितेंच्या कवितांच्या आकलनासाठी रचना यांनी स्रीवादी समीक्षक सिमॉन दि बोव्हा यांच्या सिद्धांतातील संकल्पनेचे उपयोजन केलेले आहे. ही या समीक्षा ग्रंथाची जमेची बाजू होय. वैशाली मोहिते यांच्या कवितांतील सिता, राधा व राम मिथकांची योजना करण्यामागील भूमिका व मिथकांचा आजच्या काळासंदर्भातील अन्वयार्थ लावला तर मोहितेंच्या कवितांचेवेगळेपण लक्षात येईल. त्यांनी योजलेली प्रतिमासृष्टी खास समकालीन आहे. उदाहरणार्थ मन डाऊनलोड करणे, माणसांचा बाजार इत्यादी प्रतिमा वेधक आहेत. यादृष्टीनेशोध घ्यायला वाव आहे.
             श्रावणी बोलगेंच्या कवितांत आत्मभान असून स्री-पुरुष विषमतापूर्ण समाजव्यवस्थेतील अनेक दोषांचे सोदाहरण प्रतीकात्मक चित्रण येत असल्याची मांडणी रचना यांनी केलेली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीतील दुटप्पीपण स्रीयांच्या शोषणाला कारणीभूत ठरत असल्याची तीव्र जाणीव बोलगेंच्या कवितांतून व्यक्त होते. बलात्कारित स्रीचे दुःख व तृतीयपंथीयांच्या वेदनांशी तादात्मिकरण करून घेतल्याने त्यांच्याविषयीच्या तरल संवेदना व्यक्त करणारी अभिव्यक्ती वेधक आहे. श्रावणी बोलगे  यांनी अलक्षित विषय हाताळल्याने त्यांच्या कवितेतील आशयाचे नाविन्य चटकन लक्षात येते, असे निरीक्षण रचना यांनी नोंदविले आहे. बोलगेंच्या कवितांतून स्त्रियांच्या व्यथांचे व्यापक चित्रण करण्यात आले असल्याचानिष्कर्ष काढलेला आहे. उत्तरआधुनिक जीवनव्यवहाराचे संदर्भ बोलगेंच्या कवितांना आहेत असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या अनुषंगाने सोदाहरण विश्लेषण करता आले असते.
              श्रीमती स्वाती पाटील यांच्या कवितांतून स्रीच्या सोशिक वृत्तीचे अनेक दाखले आलेले आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने ग्रामीण जीवनावर केलेल्या विदारक परिणामांचे चित्रण करण्यात आलेले आहे. स्रीयांतील सकारात्मक वृत्तीच त्यांचे आत्मबल वाढीस कारणीभूत ठरत असल्याचा नवा काव्याशय स्वाती पाटील यांनी घडविला आहे. उदाहरणार्थ,
“ नवरा मेला सोडून गेला तरी
नसतंच कोणालाही सुतक
तिच्याएकटेपणाचं...
त्याच्या टायमाला
कावकावणारे कावळे
तिच्या वेळी मात्र
कुठं गायब होतात
कोण जाणे?
संस्कृती जतन का काय म्हणतात
ते हेच असेल का कदाचित??
तिच्या जीतात्म्याचा काकस्पर्श रोखणारं..!”
  ताराबाई शिंदेंच्या लेखनशैलीची आठवण करून देणारी ही कविता प्रश्नार्थक शैलीत अवतरते तेव्हा आपल्या समाजातील विसंगतींवर नेमकेपणाने बोट ठेवते. स्रियांची कविता कशी असावी याची दिशा प्रस्तुत लेखनशैलीतूनध्वनित होते. या दृष्टीने स्वाती पाटील यांची कविता महत्त्वाची असल्याचे मत रचना यांनी नोंदविले आहे.
डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या कविता सामाजिक जाणिवांचे चित्रण करणाऱ्या व विद्रोही प्रकृतीच्या आहेत. पती-पत्नीच्या सहजीवनाविषयी यांनी घेतलेली भूमिका आदर्शवत आहे. पतीने पत्नीला सोबती, सहप्रवासी किंवा सांगाती म्हणून सन्मानपूर्वकस्थान द्यावे, परावलंबी समजू नये, हा विचार महत्त्वाचा आहे.स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला समर्थन देणारा काव्याशय घडवून त्यांनी विदर्भाच्या जनतेच्या हलाखीकडेहीलक्ष वेधले आहे. स्पष्ट राजकीय भूमिका व तत्त्वज्ञानाच्या बैठकीमुळे त्यांच्या कवितेतील वैचारिकता प्रगल्भ जीवनदृष्टीचा प्रत्यय देते. वानखेडे या कवितेच्या आशयाबरोबरच रूपदृष्ट्या सजगता असलेल्या कवयित्री आहेत.
                रचना यांनी संगीता गुरव यांच्या कवितांतील घर, स्री व पुरुष हे आदिबंध उलगडवून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.संसाराच्यानित्य रगाड्यात पिचलेल्या स्री-मनाचे प्रातिनिधिक अनुभव मांडलेले आहेत. समई व नदी पारंपरिकप्रतीकांचे वाचन केले आहे. संगीता गुरव या रुपदक्ष कवयित्री असल्याचा प्रत्यय त्यांच्या कवितांतून येतो. उदाहरणार्थ पहा,
“घरानं बडवलं उंबऱ्यानंअडवलं
भिंतींनी कोंडलं, चुलिनी मांडलं
छपरानं झाकलं, अश्रूंनीसारावलं
भाजलं-कापलं, सललं, सोसलं
दुःखतिचं बोललं”
       क्रियापदांच्या विशिष्ट योजनेतून निर्माण झालेल्या आवृत्तीमुळे कवितेत लयबद्धता निर्माण होते. अनुस्वारांच्या आवृत्तीतून लयबद्धतेला, अर्थाच्या सुचकतेला अधिक उठाव प्राप्त होतो. हे उत्तम काव्यसंहितेचे लक्षण आहे. यातून गुरव यांच्या अभिव्यक्तीचे वेगळेपण चटकन नजरेत भरते. रचना यांनी आशयविशेषांवर भर दिल्यामुळे अभिव्यक्ती वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणे राहुन गेले आहे.
              अर्चना डावखर या धाडसी काव्याभिव्यक्ती असलेल्या कवयित्री असल्याचे मत रचना यांनी नोंदविले आहे. समकालीन जीवनाचे आकलन करून घेण्यासाठी सीता व द्रौपदी या मिथकांना त्यांनी नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधवास्रीच्या मनातील भाव-भावनांचीआंदोलनेअत्यंत संवेदनशीलपणे व्यक्त केल्याने मराठी काव्यपरंपरेच्या आशयात्मक वाढीस त्यांनी हातभार लावला आहे. विधवा स्रीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्याच्या सामाजिक मानसिकतेला त्यांच्या कवितेतून जाब विचारला जातो. प्रेम, विरहाचे धीट वर्णन केल्याने ही कविता स्रीवादी प्रकृतीची असल्याचा प्रत्यय येतो. अर्चना डावखरांच्या कवितांतील आशयाचे नाविन्य प्रशंसनीय आहे. स्री-विशिष्ट अनुभवांच्या मांडणीतून सूचकता प्रकट केल्याने समकालीन मराठी स्री-कवयीत्रींत त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे वेगळेपण रचना यांनी नमूद केलेले आहे.
             सावित्री जगदाळे या जेष्ठ कवयित्री आहेत. त्यांनी‘विठ्ठल’ व‘कविता’ ही दोन मिथके मांडून स्वतंत्र काव्याभिव्यक्तीची चुणूक दाखवून दिलेली आहे. मराठी कवितेच्या परंपरेशी अनुबंध साधणारी अभिव्यक्ती असल्याने त्यांच्या कवितेतील वैचारिकता संघर्षाऐवजी समन्वयाची भूमिका वठवते. त्यांनी योजलेल्या ‘विठ्ठल’ या मिथकाची सविस्तर चिकित्सा करणे उद्बोधक ठरेल. रचना यांनी त्यांच्या कवितांचे आकलन स्री जाणीव व संवेदना या केंद्रवर्ती सूत्र अभ्यासाच्या आधारे केलेले आहे.आत्मनिष्ठेकडून आत्मशोधाकडे वाटचाल करणारी स्री प्रतिमा आत्मोद्धाराच्या दिशेने विचार करू लागते ही खास भारतीय स्री संवेदना सावित्रीजगदाळेंच्या कवितांतून प्रत्ययाला येते. त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान व्यावहारिक अनुभूतींतून तपासात संत कवितेशी नाळ जुळवून घेतल्याने अधिक प्रगल्भ स्री जाणीवा व संवेदनानुभूतींचे आविष्करण केलेले आहे.
            मनीषा पाटील या गंभीर प्रकृतीच्या कवयित्री आहेत. विधवा स्रीला आलेल्या दुःखद अनुभवांचे धारदार कंगोरे त्यांच्या कवितांतील आशयाची व्यापक अर्थक्षमता दर्शविणारे आहेत. झोकून देऊन नाते जपण्याच्या स्त्रियांच्या नैसर्गिक स्थायीभावाकडे त्यांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. पारंपरिकलोकोक्तींना नवीन अर्थ बहाल करण्याचे कसब म्हणून त्यांची ‘बायका’ ही कविता उल्लेखनीय आहे. पाटील यांच्या कवितांच्या आधारे संस्कृतीची निर्मिती, उभारणी व विकासातील स्रियांचे योगदान दुर्लक्षित केले जाते, त्यामागे असलेली हेतुपुर्वकता रचना यांनी उलगडवून दाखवली आहे. त्यांची एक कविता पहा,
“नसतेच सुंदर बाईपण
जाहिरातीत दाखवतात तसे
रापलेली बोटं, टाचेच्या भेगा
साक्षीलाच असतात तिच्या उन्हाळ्यांच्या”
    प्रस्तुत कवितेतून माध्यमांतील आभासी स्री-प्रतिमा व प्रत्यक्षातील स्री-प्रतिमा यातील फरक दर्शवून सौंदर्याच्या बेगडी संकल्पनेचा उपहास करून सामाजिक धारणेच्या विसंगतींवर नेमके भाष्य केलेले आहे. मनीषा पाटील यांच्या कवितेतील स्रीविषयक चिंतन वाचकांना नवदृष्टी देणारे आहे, असे रचना यांनी केलेल्या विश्लेषणातून स्पष्ट होते.
         सुनंदा शिंगनाथ यांच्या कवितांतून व्यक्त झालेल्या स्री जाणीव आंबेडकरी विचारांनी प्रभावित आहेत. त्यामुळे त्या राजकीय भान असलेल्या कवयित्री ठरतात. रूपदृष्ट्या सजगता ठेवल्यास त्यांची कविता अधिक प्रभावी होईल, असेनिरीक्षण नोंदवावेसे वाटते. त्यांच्या कवितेतील संवादात्मक शैली लक्षणीय आहे. दीर्घ कवितेतचा आशयबंध घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. त्यांनी अशी काव्याभिव्यक्ती केल्यास हे त्यांचे वेगळेपण ठरेल असे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते.
           उषा हिंगोणेकरांच्या कवितेचा प्रेरणास्रोतही आंबेडकरी विचारधारा आहे.बंडखोर अभिव्यक्ती व शोषणाविरुद्ध आवाज उठविणे ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या कवितेतील विद्रोहाची भाषा क्रांतीचे आवाहन करते. क्रांतीच्या फटसीत रममाण होण्याच्या सोस ही दलित कवितेची मर्यादा ठरण्याचा धोका संभवतो. कारण क्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या चळवळींचे थंडावणे, त्यातील स्वार्थी राजकारणामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला असलेली कुंठितावस्था व पैसाकेंद्री जीवनाचे आकर्षण क्रांतीला मारक ठरणारे आहे. अशा कविता दलित वास्तवापासून दूर जातात आणि काव्याभिव्यक्तीच्यादृष्टीनेही एकसुरी बनतात. ही बाब लक्षात घेऊन हिंगोणेकारांनी लेखन केले तर त्या प्रभावी काव्यनिर्मिती करतील. प्रस्तुत प्रकरणात अशीचिकित्सा अपेक्षित होती.
               मनीषा घेवडे यांच्या कवितांतून प्रेमाच्या तरल स्री अनुभूतींच्या संवेदनांचा प्रत्यय येतो. धरती, आभाळ व सूर्य या पारंपरिक प्रतीकांची योजना करण्यात आलेली आहे. दैहिक अनुभूतींचा धीट अविष्कार करणाऱ्या स्रीवादी काव्यपरंपरेत त्यांनी भर घातली आहे. तसेचछाया बेले यांच्या कवितांतून स्रीसंवेदनांबरोबरचसामाजिक प्रश्न व समस्यांवर सूचक भाष्य येते असे निरीक्षण रचना यांनी नोंदविले आहे. अमृता प्रीतम यांच्या प्रभावातून कवयित्रीचे काव्यव्यक्तीमत्व स्रीवादी अभिव्यक्तीसाठी अधिक उजळ झाले.स्रियांसाठी घर हे ‘कबर’ ठरत असल्याची विस्मयकारक जाणीव त्या करून देतात. त्यांच्या कवितांतील आशयाची व्यापकता वाखाणण्याजोगी आहे. अल्पाक्षरी शैली, सूचकता या विशेषांमुळे कवितेतील सौंदर्यानुभूतीचा प्रत्यय येतो. त्यांच्या कवितेतील सामाजिकतेची सोदाहरण चर्चा करण्यात आलेली आहे.
          योगिनी सातारकर पांडे यांच्या कवितांतून प्रगल्भ स्री जाणीव व संवेदनांचा प्रत्यय येतो. समकालीन वास्तवाचे आकलन करून घेण्यासाठी मिथकांची योजना करून स्री पुरुष नात्याचा प्रभावी अर्थ उलगडण्याचा प्रयत्न म्हणून त्यांच्या काव्यसंहितांचे ठळक वैशिष्ट्य नोंदविता येते. उदा. द्रौपदी व कृष्ण या मिथकांची मैत्रभावाचे प्रतिक म्हणून योजना करण्यात आलेली आहे.त्यांच्या कवितांतील कमालीची सूचकता लक्षवेधक ठरते उदाहरणार्थ,
“फक्त दोन सीझर्सनी शिवलेल पोट
आणि तीन गर्भपातांच्याओझ्याने मोडलेली कंबर
दिसत नाही कोणाला इतकच !”
            स्रीबरोबर तिच्या वेदनांनाही गृहीत धरणे अन्यायकारक आहे ही जाणीव उपहासाने करून देण्यात आलेली आहे. कवितेतील संवादात्मक शैली काव्यगत अर्थाला अधिक उठाव प्राप्त करून देते. पुरुषसत्ताक राजकारणातील कावेबाज डावपेच स्रीशोषणाच्यामुळाशीआहेत, हे भान प्रकट होते. संस्कृती अभ्यासाचे पुनर्वाचन करून यांच्या ऐतिहासिक योगदानाची पुनर्मांडणी करण्याचा विचार मौलिक आहे. त्यांनी चित्रित केलेली द्रौपदीची प्रतिमा मुळातून वाचण्यासारखी आहे. ही काव्यअभिव्यक्ती समकालीन स्री कवितांत मौलिक भर घालणारी आहे.
            गीतांजली वाबळे यांनी अभंग, गझल व हायकू बरोबरच मुक्तछंदातही कविता लिहिल्या आहेत. स्रीवादी विचारांचा प्रभाव डोंबाऱ्याच्या मुलीचे प्रतीकात्मक रुपात चित्रण करून स्रीचे आयुष्य / जीवन असेच टांगणीला लागलेले सतत पुरुषांच्या हातात तिच्या नियंत्रणाचा दोर असल्याने व्यवस्थेच्या तालावर नाचनेच तिला भाग पाडले जाते, हा काव्याशय व्यापक जीवनदृष्टीचा प्रत्यय देणारा आहे. त्यांनी घेतलेलास्वत्त्वाचा शोध वेधक आहे. ही अपेक्षा वाढवणारी काव्याभिव्यक्ती आहे.
        उपसंहारात रचना यांनी पंधरा कवयित्रींच्या कवितांच्या वैशिष्ट्यांचा थोडक्यात धांडोळा घेतला आहे. या सर्व कवयित्रींच्या कवितांतून कोणते युगभान प्रकट होते? जागतिकीकरणाच्या भूलभूलैयाला स्री जाणीवा कशा प्रतिसाद करतात? स्री संवेदनेचे स्वरूप बदलते का? प्रतिमा, प्रतीके व मिथके यांची नव्याने योजना करण्यात आलेली आहे का? पाश्चात्य स्रीवाद व भारतीय स्रीवाद याविषयी मौलिक चिंतन असलेली वैचारिक भूमिका कोणत्याकवयित्रींच्याकवितांतून प्रकट होते? आपल्या समाजातील अन्य भेदांकडे स्री कवयित्री कशा पाहतात? पूर्वसुरींचा प्रभाव कोणी पचवला आहे? नव्या काव्यसंहिता घडविण्याचे सामर्थ्य कोणत्या कवयित्रींत आहे? स्रीवादी कवितेची सौंदर्यमुल्ये समकालीन मराठी स्री कवयित्रींच्या कवितांतूनप्रकट झालेली आहे का? अशा काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतल्यास रचना यांच्या समीक्षा व्यवहारात भर घालण्यास पुरता वाव आहे. रचना यांच्या समीक्षा ग्रंथाचे वाचक, अभ्यासक स्वागत करतील. अभ्यासक संदर्भ म्हणून नोंद घेतील हा विश्वास वाटतो.


संदर्भ:
१) रचना,स्री जाणीवा आणि स्री संवेदना: एकअभ्यास (निवडक कवयित्रींच्या आधारे),साहित्याक्षर प्रकाशन, संगमनेर,ऑगस्ट २०१९, पृ. ६५
२) उ. नि. पृ.९५
३)उ. नि. पृ.१३७
४) उ. नि. पृ.२१५


साहित्याक्षर प्रकाशनाचे पहिले पुस्तक म्हणजे 'स्त्री जाणीवा आणि स्त्री संवेदन 'रचना यांनी लिहिलेल्या या समीक्षाग्रंथाचे आकलन करणारा हा लेख डॉ.अरुण ठोके यांनी लिहिला आहे.त्यांचे हार्दिक आभार.ब्लोगला भेट देणाऱ्या रसिकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत.धन्यवाद.
- संपादक



बुधवार, 25 मार्च 2020

सांगलीचे वसंत केशव पाटील उर्फ वके सर हे हिंदी अनुवादक आणि ज्येष्ठ कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. मित्रवर्य अभिजीत पाटील यांच्या ' अबीर गुलाल ' या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहभाग नोंदवताना  वकेंची ओळख झाली. त्या आधी त्यांना वाचून होतोच. नुकतेच ते ७५ त पदार्पण करत आहे त्याचे औचित्य साधून आभिजीतची प्रतिक्रिया आणि सरांच्या परिचय देत आहे...
 - संपादक

 वकेंच्या ७५ च्या निमित्ताने त्याच्या वरील लेख अनेकांनी  लिहिले बहुतांशी लेखात वकेंच्या साहित्या बद्दल त्याच्या अनुवादा बद्दल वकेंचे कौतुक केले आहे ,
परंतु त्याच्या वागण्या बोलण्यातून कधीकधी कृतीतून चर्चेतून त्याच्या बद्दलच्या समज गैरसमजाची चर्चा कमीजास्त प्रमाणात अधिक झाली विक्षिप्त पणा हा गुण मोठ्या लेखकांना शोभून दिसतो, ते तसे का याचा शोध घेतांना त्यांनी तसेच रहावे तरच ते "ते" असतात त्याच्यातल्या त्याला बाजूला केलं तर काय उरते म्हणून लिहिली कविता *अवघड आहे*
अवघड आहे या माणसावर
कविता लिहिणे,
कथा म्हणाल तर
कुठून करणार सुरूवात ?
कादंबरीत बसेल म्हणता हा माणूस ? ...
अवघड आहे !
दिसतो तुम्हाला आम्हाला तसा आहे का ?
आहे तो नेमका तसा का ?
कठीण आहे शोधणे...

पण जाणून घेणे म्हणजे
पाण्यात पाय सोडून बसावे तासन् तास
त्याच्या बदलत्या
प्रवाहा सोबत त्याच्या लयीचा अंदाज घेत,

पण तळ सापडेल तर शपथ !
शोधू नका तळ,
तो मात्र एका खोल अंशावर घट्ट आहे स्वतःला धरून
एखादा लाव्हा उगमस्थाना सारखा...

म्हणून त्याची कहाणी होते पुढे
कोण जाणे पुढे
दंत्तकथाही होतील...
आपण मात्र एखाद्या बुलंद
राजवाड्याच्या दरवाजातून
ये - जा करत या माणसांचा स्नेह जपायचा,
आणि त्या भव्य प्रवेशव्दारा वर आपली अक्षरे लिहायची
काही राहतील काही पुसून जातील,
कारण वसंत केशव पाटील
हीच अक्षरं इतकी मोठी आहेत की
आपली अक्षरं फक्त आपल्यालाच दिसतील ,
तुम्हाला काय वाटतं ?...

- अभिजीत पाटील सांगली

वके सरांचा परिचय

वसंत केशव पाटील,जन्मदिनांक : २० मार्च १९४६ 
२८ वर्षे सेवा... निवृत्त प्राध्यापक. सध्या निवास : सांगली मोबा. ९७६७७५१२३०. 
     *प्रकाशित पुस्तके*
📙 दशद्वार ते सोपान 📙 कंदीलाचा उजेड 
📙 दिपराग📙अखेरचे झोपडे 📙 त्याने जंगल जिंकले
📙 छप्पर 📙 कर्मवीर भाऊराव पाटील 
📙यशवंतराव : विचार आणि वारसा 
📚... यासह अनुवादीत नि स्वत:ची एकुण २० पुस्तके प्रसिद्ध. अनेक पुस्तकांच्या दोन-तीन आवृत्ती प्रकाशित... 

    *पुरस्कार व सन्मान*
🏆साहित्य अकादमी पुरस्कार अनुवादासाठी १९९६
🏆महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०००
🏆वसंतदादा पाटील साहित्यरत्न पुरस्कार १९९०
🏆तांबटकाका साहित्य गौरव पुरस्कार २०००
🏆कऱ्हाड गौरव पुरस्कार १९९७
🏆जेमिनी अकादमी पानीपत(पंजाब)डाॅ. दुबे पुरस्कार २००१
🏆सहस्राब्दी विश्व हिंदी सेवा पुरस्कार २००१
🏆एशियन - अमेरिकन 'हूज हू' मध्ये समावेश २००१
.... यांसह अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय मानसन्मान, पुरस्कार,साहित्य संमेलनाध्यक्ष पदे...


'वसंत केशव पाटील' यांनी कथा, कविता, गझल, ललित व समीक्षा या साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले आहे. याशिवाय हिंदी, उर्दू, तेलगू व पंजाबी भाषेतील साहित्यकृतींचा मराठीत अनुवाद केला आहे. लेखन कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१५ मध्ये सांगलीत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला होता. तेलगू मधील केशव रेड्डी, पंजाबीतील गुरुदयाळ सिंह, हिंदीतील हरिवंशराय बच्चन यांच्या सह अनेक लेखकांच्या साहित्य कृतींचे मराठी अनुवाद केले आहेत. जवळजवळ २० पुस्तके व.के. सरांच्या नावावर आहेत. त्यापैकी 'अखेरचे झोपडे' ही अनुवादित कादंबरी व 'छप्पर' हा कथासंग्रह विशेष गाजला.


अधांतरीचे प्रश्न - अभिप्राय


       अर्चना डावखर यांनी ९६ पृष्ठांच्या या संग्रहात एकल स्त्रीच्या जगण्याचे नानाविध स्तर धीटपणे मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. एकटया राहणाऱ्या , त्यातही सधवा नसणाऱ्या स्त्रीचा भोगवटा मराठी कवितेत अभावानेच व्यक्त झालेला आहे. अर्चना डावखर यांनी हा प्रयत्न नेमकेपणाने केलेला आहे.काही ठिकाणी ठेवलेल्या बाईच्या मानसिकतेची अंदोलने दिसतात. आपल्या वाट्याला आलेले दुय्यमपण 'निकाह ' सारख्या चित्रपटांतून दिसलेच. ठेवलेपण आणि नाकारले जाणे यामुळे स्त्रीचे जळणे चांगल्या रितीने डावखर व्यक्त करतात. ' गळालेले अवयव ' ही कविता त्या दृष्टीने लक्षणीय म्हणता येईल.
   बाईने थोडे समाजाचा संकेतांना धक्का दिला किंवा पुरुषाशिवाय स्वतःच प्रगती करण्याचा प्रयत्न केला की तिला कॅरेक्टरलेस ठरवले जाते. समाजाच्या या विखारी वागण्याचा समाचारही डावखर घेताना दिसतात.
   संग्रहाच्या सुरुवातीला अष्टाक्षरी, अभंग अशा रूढ वाटेने जाणारे प्रकार कवयित्री हाताळते. मात्र उत्तरार्धातील कविता यांनी संग्रहाची उंची वाढवलेली आहे. या कविता अनुभूती आणि त्यांची सेंद्रियता जाणवून देणाऱ्या आहेत. 'रोपाचं पुनर्वसन ' सारख्या कविता तर अंगावर येण्याइतपत सशक्त झाल्या आहेत.
    एकंदरीत कादंबरीपेक्षा डावखर ' कविता ' हा प्रकार ताकदीने हाताळतात असे निश्चितपणे म्हणता येते. त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा..

- डॉ. संजय बोरुडे, अहमदनगर.
[3/24/2020]

रविवार, 22 मार्च 2020

साहित्याक्षर प्रकाशनाचे दुसरे पुस्तक 'कशमकश ' प्रकाशित.


साहित्याक्षर प्रकाशनाचे दुसरे पुस्तक 'कशमकश ' प्रकाशित.

          साहित्याक्षर प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला हिंदी कवितासंग्रह नुकताच दप्रकाशित झाला असून 'कशमकश' असे त्याचे नाव आहे. शासनाचा 'केशवसुत पुरस्कार' प्राप्त असलेले प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या निवडक १०० मराठी कवितांचा हिंदीत अनुवाद  डॉ.संजय  बोरुडे (प्रसिद्ध कवी,अनुवादक व लेखक)यांनी केला आहे,या हिंदी संग्रहात १५२ पृष्ठे असून त्याची किंमत २१० रुपये आहे. साहित्याक्षरचे हे दुसरे पुस्तक असून आणखी आठ पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत . रचना (शासनाचा श्री.ना.पेंडसे पुरस्कार प्राप्त लेखिका) यांनी महाराष्ट्रातील वेगळ्या वेगळ्या आर्थिक परिस्थितीतून आलेल्या नव्या कवयित्रीच्या  कवितेवर लिहिलेला 'स्त्रीसंवेदन आणि स्त्रीजाणिवा ' हा समीक्षाग्रंथ साहित्याक्षरचा पहिला ग्रंथ आहे.त्याचे वाचकांनी उत्स्फूर्त असे स्वागत केले आहे. 

  सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी संपर्क क्रमांक :

                                                        9767516929
                                                        7066301946
                                                        7218792186