शनिवार, 30 मई 2020

गीतकार योगेश यांची एक्झिट



 

गीतकार योगेश यांच्या  निधनाची वार्ता घेऊन आजची सकाळ उगवली आणि तीव्रतने जाणवलं की , अरे, हा तर 70च्या दशकातला जेंव्हा माझी मध्यवर्गीय  पिढी किशोर- तारुण्यभानाच्या उंबरठ्यावर होती, तेंव्हाच्या आमच्या अबोध भावभावनांना ज्यानी उजागर केलं आणि मंत्रमुग्ध केलं ते   हेच योगेश तर होते. 
     
        माझ्या मनाचा योगेशने कब्जा घेतला तो "रजनीगंधा फुल तुम्हारे युंही महके जीवनमे" या गीताने. योगेशचे तरुण मनाच्या हुरहूरत्या भावना समर्पकपणे व्यक्त करणारे नाजूक शब्द, सलील चौधरी यांचे सुरेल  संगीत आणि  विद्या सिन्हाचे आपले वाटणारे घरेलू रूप यामुळे या गीताने माझ्या मनावर तेंव्हा जे गरुड केले होते ते आजही कायम आहे. त्यातली ही ओळ"युंही महके प्रीत प्रिया की मेरे अनुरागी मन मे" आजही मधुर शब्दांमुळे माझ्या मनात रुंजी घालते. याच "रजनीगंधा" मधले त्यांचं मुकेशने गायिलेले "कई बार युंही देखा है, ये जो मन की सीमारेखा है,मन दौडने लगता है- अंजन आस के पिछे" तेवढेच मनात घर करून आहे.

        खरं तर"आनंद" हा योगेश यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट. तो लोकांच्या स्मरणात आहे तो राजेश खन्नाच्या अविस्मरणीय अभिनयामुळे. पण आनंद या व्यक्तिरेखेचे दोन शेड योगेशच्या गीताविना  राजेश साकार करू शकला नसता. "दूर कही जब दिल ढल जाये, सांझ की दुलहन बदन चुराये- चुपके से आये" ही विरहाची समंजस  वेदना ज्या नजाकतीने योगेशनी शब्दबद्ध केली आहे, तिला तोड नाही. दुसरे फिलॉसॉफीकल गीत"जिंदगी कैसी है पहेली हाये" हे कुठेही preachy न होणारं गीत . माझं जीवनाचे तत्वज्ञान या गीताने सुरू होते व या गीतावरच संपते असं म्हणलं तर अतियशोक्ती होऊ नये!
    
     आणखी एक गीत आज त्यांची आठवण करताना आठवतं ते म्हणजे "न जाने क्यूँ होता है जिंदगी के साथ , अचानक ये मन,  किसी के जाने के बाद, करे उसकी याद, छोटी छोटीसी बात-' हा प्रतेकला येणारा अनुभव किती सहजपणे पण तरलतेने  योगेश व्यक्त करतात. पुन्हा येथे या शब्दांना पडद्यावर साकारणारी विद्या सिन्हा!
  
      आणि "Manzil" मधले अमिताभ व मौसुमी चॅटर्जी वर चित्रित झालेले आर्डी च्या सुरावटीने भिजले योगेशचे गीत ,ज्याला मान्सूनचे अँथेंम - गीत म्हणता येईल ,ते म्हणजे 
     "रिमझिम गिरे सावन, 
सुलग सुलग जाये मन. भिगे आज इस मौसम मे,लगी ये कैसी अगन". हे गीत केंव्हाही ऐक, मन उत्फुल व प्रेमगंधीत होऊन जातं!
   
     असा हा माझ्या पिढीचा पण आजही सर्वांना आवडणारा योगेश. तो आपल्या भावविश्वाचा भाग होता. त्याने  प्रामुख्याने हृषीकेश मुखर्जी व बासू चॅटर्जी यांच्यासाठी , ज्यांना आर्टफिल्म वा समांतर फिल्म म्हणले जाते, त्यातला middle of path पकडणारा व निम्न्न मध्यमवर्गीय जीवनाचे प्रगटीकरण करणाऱ्या सिनेमासाठी प्रामुख्याने गीते लिहिली. शुद्ध पण सोप्या हिंदी भाषेत त्याची गीतं होती, पण "अनुरागी मन" "सांझकी  दुलहन" किंवा "मन की सीमारेखा" सारख्या भाव विभोर प्रतिमा आणि अबीध मनातील सुप्त भावना नेमक्या प्रगट करणारी काव्यप्रतिभा  या मुळे तो खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या  उत्कट भावनांचा प्रभावी भाष्यकार होता असे मी नि:संदिग्धपणे म्हणेन!

   हे कांही योगेशच्या समग्र गीतांचे रसग्रहण नाही की भाष्य नाही, तर त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मन Nostelgic झालं आणि मनात जे भावतरंग उठले ते शब्दबद्ध केले एवढेच! 
      एक मात्र नक्की माझ्या भावविश्वाचा एक तुकडा योगेश मुद्रेचा होता व राहील.  आणखी एक हळहळ कायमची वाटत राहील की योगेश यांच्या प्रतिभेचे मोल ओळखण्यात हिंदी फिल्मी जगत कमी पडले. त्यामुळे तुम्हा आम्हा रसिकांचे किती नुकसान झाले याची नुसती कल्पना केली तर सल गहिरी होते. असो. 

     जी मोजकी गीतं आम्हास मिळाली ती कायम स्मरणात राहणारी व आठवणारी आहेत. मुख्य म्हणजे मन तरल करणारी व एक हुरहूर लावणारी आहेत.  अश्या हुरहुरीने आपलं जगणंही भावसंपन्न होतं! आणि हे योगदान कांही कमी नाही!अन्नदाता या सिनेमातली 
रातों के साये घने
निसदिन निसदिन मेरा जुलमी सजन
नयन हमारे सांजसकारे देखे कोई सपना
ही योगेश यांची गीते,सलील चौधरी यांची विलक्षण संगीत रचना आणि लताबाई,मुकेश याचे स्वर
हा  एक सुंदर योग होता
   
     योगेशी जी, आज तुम्ही आमच्यात नाहीत आणि एक छोटीशी का होईना पोकळी मला माझ्या भावजीवनात तुमच्या नसण्याने जाणवत राहणार. तुमच्या " मिली" सिनेमातील एका गीताचा आधार घेत तुम्हाला  मी असं म्हणेन की 
"बडी सुनी सुनी जिंदगी "हो गयी अपनी तुम्हारे बिना!

      आता आठ पंधरा दिवसात पुन्हा ऋतुचक्राच्या गतीने मान्सून बरसेल आणि त्यात चिंब होताना आम्ही तुमचे शब्द आपले म्हणून गुणगुणू"रिमझिम गिरे सावन" तर कधी दूर गेलेल्याची आठवण आली की "न जाने क्यू - करे किसकी याद छोटी छोटी बात" म्हणत कातर होऊ. त्यावेळी तुम्ही आम्हास फार फार आठवणार!
 
      तुम्हाला अलविदा कसं म्हणू? तुम्ही आमच्या भावविश्वात राहणार आहातच!
-फेसबुक वॉल वरुन..

दै.अमर उजाला : 

बॉलीवुड को एक से बढ़कर एक गीत देने वाले गीतकार योगेश गौर (Yogesh Gaur) ने इस दुनिया को अलविदा कह दिया है। योगेश की गिनती उन गीतकारों में होती है जिन्होंने अपने समय में सबसे बेहतरीन फिल्मकार रहे ऋषिकेश मुखर्जी, बासु चटर्जी आदि के साथ खूब काम किया है। वहीं हिंदी सिनेमा के पहले सुपरस्टार राजेश खन्ना की फिल्म 'आनंद' के लिए भी योगेश ने ही गीत लिखे थे। योगेश ने भले ही हम सबको अलविद कह दिया हो लेकिन उनके गीत हमेशा हम सबके जेहन में रहेंगे।
योगेश की आखिरी बड़ी रिलीज फिल्म किशन कुमार स्टारर बेवफा सनम थी। याद दिला दें कि योगेश ने फिल्मों के अलावा कुछ टीवी कार्यक्रमों के लिए भी लेखन किया था। अपने गीतों के बारे में एक इंटरव्यू में योगेश ने कहा था, 'जो देखा था, जो जीता था, वही लिखा है। मैंने हमेशा अपने आस-पास के लोगों के बारे में लिखा।' फिल्मों के अलावा अगर बात योगेश के चुनिंदा बेहतरीन पांच गीतों की करें तो, 'कहीं दूर जब दिन ढल जाए', 'जिंदगी कैसी है पहेली', 'रिमझिम गिरे सावन', 'कई बार यूं ही देखा है', 'ना बोले तुम ना मैंने कुछ कहा' के बिना लिस्ट अधूरी कहलाएगी।

गुरुवार, 28 मई 2020

पुरातत्व विद्या

पुरातत्त्वविद्या : इतिहास (History of Archaeology)
 




• प्रमोद जोगळेकर
• प्रागैतिहासिक काळ
 
भूतकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल ही खास मानवाची वैशिष्ट्ये आहेत. मानवी संस्कृतीला किमान पंचवीस ते तीस लक्ष वर्षांचा इतिहास आहे. इतक्या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; कारण लेखनकला ही तुलनेने अलीकडची म्हणजे गेल्या अवघ्या सहा ते सात हजार वर्षांमधली आहे. लिखित स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नसलेल्या काळाचा इतिहास बघण्यासाठी पुरातत्त्वविद्या उपयोगी पडते. पूर्वी पुरातत्त्वविद्येचे स्वरूप केवळ पुराणवस्तू-संशोधन आणि कलात्मक वस्तूंचे वर्णन असे होते आणि हे काम प्रामुख्याने धनिक लोक हौस अथवा छंद म्हणून करत असत. परंतु आता पुरातत्त्वविद्येचे स्वरूप संपूर्णपणे पालटलेले आहे. आता ती एक इतिहासाला मदत करणारी पण पारंपरिक इतिहासापेक्षा वेगळी आणि स्वतंत्र पद्धती व उद्दिष्टे असणारी ज्ञानशाखा झालेली आहे. या बदलाचा इतिहास बघताना पुरातत्त्वज्ञांनी काही कालखंड कल्पिले आहेत. अर्थात हे कालखंड सोयीपुरते असून नवीन गोष्टी आल्या, तरी सगळ्या जुन्या रचना व पद्धती संपल्या, असे मात्र नाही.
पुरातत्त्वविद्येचा उगम हा पहिला कालखंड आहे. सुमारे दोनशे वर्षे (सतरावे व अठरावे शतक) पुरातत्त्वीय अवशेषांकडे छंद म्हणून अथवा काहीतरी अद्भुत म्हणून बघितले जात असे. प्राचीन अवशेषांचा अर्थ लावताना लोक प्रामुख्याने वैयक्तिक अंदाजांवर विसंबून राहत असत; कारण मुळात हौस भागवण्यासाठी अथवा गंमत म्हणून श्रीमंत लोक पुरातत्त्वाकडे वळत. पुरातत्त्वविद्येला अद्याप  एक ज्ञानशाखा म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झालेली नव्हती.

अठराव्या शतकात आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आधुनिक पुरातत्त्वविद्येची पायाभरणी सुरू झाली. या कालखंडात उत्खननपद्धतीत शिस्त आणण्याचे काही प्रयत्न झाले. परंतु तेव्हा पुराणवस्तू गोळा करणे हाच पुरातत्त्वविद्येचा मुख्य हेतू होता. पुरातत्त्वविद्येचे स्वरूप प्रामुख्याने प्राच्यविद्या असे होते. पूर्वेकडील देशांमध्ये वसाहती स्थापन करताना तेथील संस्कृती जाणून घेण्याचे प्रयत्न या कालखंडात झाले. पुरातत्त्वविद्येच्या पायाभरणीच्या या काळात भूविज्ञान, संग्रहालयशास्त्र आणि जीवविज्ञान अशा अनेक क्षेत्रांमधील प्रगती उपयोगी पडली. डॅनिश पुरातत्त्वज्ञ ⇨ सी. जे. थॉमसन (२९ डिसेंबर १७८८–२१ मे १८६५) यांच्या त्रियुग सिद्धांतामुळे पुरातत्त्वीय अवशेषांच्या सांस्कृतिक वर्गीकरणाची संकल्पना पुढे आली.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून सुमारे शतकाचा कालखंड (१८५०–१९५०) हा आधुनिक पुरातत्त्वविद्येच्या प्रारंभिक वाटचालीचा कालखंड आहे. या काळात एक सक्षम ज्ञानशाखा म्हणून आधुनिक पुरातत्त्वाचा विकास घडून आला. उत्खनन व पुरावशेषांची नोंदणी यांच्या तंत्रामध्ये प्रगती झाली आणि मुख्यतः पुरातत्त्वीय संशोधनाच्या उद्दिष्टांमध्ये बदल झाला. वैयक्तिक संग्रहांसाठी प्राचीन कलात्मक गोष्टी गोळा करण्याचा, गुप्त खजिने शोधण्याचा आणि अद्भुततेचा भाग हळूहळू कमी होत गेला. या काळात शतकभर जगाच्या निरनिराळ्या भागांत विविध उत्खनने झाल्याने सांस्कृतिक क्रमाचे आकलन आणि प्रागितिहास व इतिहासपूर्व काळ यांची सुसूत्र मांडणी झाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर पुरातत्त्वाचा नवीन टप्पा सुरू झाला. ⇨ नवपुरातत्त्वाचा उदय होणे  आणि पुरातत्त्वविज्ञानाचा वाढता वापर या दोन सर्वांत महत्त्वाच्या घडामोडी या टप्प्यात घडून आल्या. सुमारे चाळीस वर्षांच्या काळात पुरातत्त्वीय संशोधनाच्या उद्दिष्टांमध्ये आणि पुरातत्त्वीय सिद्धांतांमध्ये आमूलाग्र बदल घडून आले. या कालखंडाला प्रक्रियावादी पुरातत्त्वाचा (Processual Archaeology) कालखंड असेही नाव आहे. हा टप्पा अद्यापही संपलेला नाही. जगभरात पुरातत्त्वीय संशोधनात पुरातत्त्वविज्ञानाचा आणि नवपुरातत्त्वाच्या विचारसरणीचा उपयोग आजही केला जातो.

पुरातत्त्वात सन १९९० नंतर प्रक्रियावाद आणि विज्ञानाचा वाढता वापर या दोन्हींना प्रतिक्रिया म्हणून अनेक विचारधारा निर्माण झाल्या आहेत. स्त्रीवादी, मार्क्सवादी, प्रतीकवादी, संरचनावादी आणि रचनाविघटनवादी (Deconstructionist) अशा अनेक विचारसरणींचा समावेश प्रक्रियावादानंतरच्या पुरातत्त्वीय संकल्पनेत करता येतो. या सगळ्यांना एकत्रितपणे प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्व (Post-Processual Archaeology) असे संबोधले जाते. याखेरीज पुरातत्त्वावरील चर्चांमध्ये आधुनिकोत्तर (Post-modern) विचारधारांचाही समावेश झालेला दिसतो.

संदर्भ :

•    Fagan, Brian M. A Brief History of Archaeology: Classical Times to the Twenty-First Century, 2004.
•    Hodder, Ian.; Ed. Schiffer, M. B. ‘Post-processual Archaeologyʼ, Advances in Archaeological Method and Theory, London, 1985.
•    Preucel, R.W. & Hodder, Ian Eds., Contemporary Archaeology in Theory : A Reader, Oxford, 1996.
•    Renfrew, Colin & Bahn, Paul G.  Archaeology, London, 2012.

  • भारतीय पुरातत्व विद्या या हिंदी पुस्तकाच्या फ्री पीडीएफ साठी लिंक :


रविवार, 24 मई 2020

वसंत मुरदारे नावाचा अलक्षित कवी : डॉ.संजय बोरुडे

              वसंत मुरदारे नावाचा अलक्षित कवी 
वसंत मुरदारे ,7666346415

प्रतिभासंगम साहित्य व संस्कृती मंच च्या वतीने मी अनेक कविसंमेलनाचे आयोजन करायचो, त्या प्रत्येक कार्यक्रमाला शेवगावचे ज्येष्ठ कवी वसंत मुरदारे आवर्जून  उपस्थित रहायचे.. या कार्यक्रमातूनच संदीप काळे ( पाथर्डी ), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी) यांसारखे नवे कवी पुढे आले. साम टीव्हीचे निवेदक दुर्गेश सोनार (पंढरपूर) यांना उमेदीच्या काळात आमच्या मंचाने खूपदा बोलावले. ऐश्वर्य पाटेकर (नाशिक) तेव्हा विद्यार्थीदशेत असताना इकडे नेहमी यायचा. या गोष्टीला विजय नांगरे (चांदा), रामदास सोनवणे ( घोडेगाव ), रामकृष्ण जमदाडे (खडका फाटा), कैलास गडाख (सोनई), दत्ता साकोरे (निमगाव म्हळुंगी)यांसारखे अनेक लोक साक्षीदार आहेत. त्यावेळची कात्रणे, फोटोही उपलब्ध आहेत. 
     साधा शर्ट आणि पॅन्ट असा पोशाख असण वसंतरावांनी कधी कुणाच्या कुचाळक्या केल्याच्या मी पाहिल्या नाहीत. अनेक प्रतिष्ठित मंचावरून आपत्या कविता ऐकवताना स्वत : ला अहंकाराचा वारा लागू दिला नाही. मुक्तछंदातील असो वा लयीतली कवित त्यांचे सादरीकरण लक्षवेधी आणि लक्षात राहणारे असायचे. शेवगाव ग्रामपंचायतच्या जकात नाक्यावर काम करणारे मुरदारे यांची आर्थिक स्थिती जेमतेम असली तरी महाराष्ट्रभर चांगले मैत्र जपले आहे. कवितेच्या प्रमोशनसाठी कुणाकडेही लाळघोटेपणा न करता आपली कविता ते व्रतस्थपणे जपत राहिले.आजच्या पिढीला कदाचित वसंतराव ठाऊक नसतील . पण सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की, त्यांच्या कविता वाचून तत्कालीन साहित्य रसिक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पत्र पाठवले होते आणि 'अनुष्टुभ' ने ते प्रकाशित केले. यावरून त्यांच्या कवितेचा दर्जा लक्षात यायला हरकत नाही. 
     यशवंतराव गडाख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या हस्ते वसंतरावांचा सत्कार करण्यात आला होता. वसंतरावांचे दोन कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकअशित झाले आहेत. त्यापैकी 'बोभाटा' हा कविता संग्रह रसिकांच्या आजही लक्षात आहे. पुढे त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चक्क शेवगाव येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांचा 'तेच लोक होते' हा कवितासंग्रह प्रकाशित केला. त्यात मारवाडी, मराठा अशा सर्व जातीचे व्यापारी होते. मला वाटते, महाराष्ट्राच्या साहित्यविश्वामधली, ग्रामीण भागातली ही एकमेव घटना असावी. अनेक कविसंमेलने गाजवणाऱ्या वसंत मुरदारे यांच्या निवडक चार कविता या निमित्ताने आपल्या पुढे ठेवतो - 

वसंत मुरदारे यांच्या कविता
१.
तेच लोक होते
माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवणारे
त्यांच्याच हातातले धारदार सुरे होते
माझ्या पोटात खोल खोल वार करणारे

तेच लोक होते
माझ्यावर फुले उधळणारे
त्यांच्याच फुलांत जहरी नाग होते
मला जागोजाग दंश करणारे..

तेच लोक होते
मला वाकून नमस्कार करणारे
त्यांच्या नमस्कारातही जादुई चमत्कार होते
माझ्या मानेला जिथल्या तिथं मुरगाळणारे..

तेच लोक होते
माझ्याशी गोड गोड मधाळ बोलणारे 
त्यांच्या गोड बोलण्यातही शिव्याशाप होते
मला पूर्णत:रसातळाला पोहोचवणारे...

तेच लोक होते
माझ्या गुणांचे गोड गोड कौतुक करणारे
त्यांच्या कौतुकातही कुटील षड्यंत्र होते
मला मृत्यूच्या खाईत जखडविणारे...

तेच लौक होते
माझ्या मढ्यावर ओक्साबोक्सी रडणारे
त्यांच्या रडण्यातही भेसूर सूर होते
मला जिवंतपणीच सरणावर चढविणारे..

तेच लोक होते
माझ्या राखेतल्या अस्थि गोळा करणारै
अस्थि गोळा करण्यातही त्यांचे वितंडवाद होते
माझी राख दाखवून स्वतःचे पोट भरणारे..

२.
जुना कष्टाचा म्हातारा बैल मेला
दूरवरुन गिधाड उडत आले
मीठ घालून त्याला शेतात पुरावे म्हटले 
तर नुस्तेच हाडाचे सांगाडे उरले..

रक्तपिपासू प्राण्यावर 
नको तितके विष फवारले
वासानं जनावरच मेले
गोचीड मात्र जिवंत राह्यले..

करकुंजाचे असंख्य थवे
टोळधाडीसारखे भुईवर आले
बिचाऱ्या भर जवानीतल्या करडीचे 
नाहकच इज्जतीचे पंचनामे झाले..

घडोघडीला रंग बदलणारे सरडे
एवढे कसे शक्तीशाली बनले..
न जाणो त्यांच्या अंगात 
कुणा नेत्याचे बळ शिरले..

हौसेखातर पाळलेले मांजर 
एवढे कसे नेभळट निघाले
राजरोस घरातले उंदीरदेखील 
त्याच्या अंगाखांद्यावर लोळू लागले..

खाऊन खाऊन लठ्ठ झालेले कुत्रे
एवढे कसे मुजोर बनले
आता भाकरीच्या तुकड्यावरही ते
खुशाल वर तंगडी करु लागले..

काळे कुळकुळीत लोभी कावळे
एवढे कसे व्यवहारी बनले
पिंडाला शिवायचेही 
ते आता पैसे मागू राह्यले..

हे कुठले लफंगे लोक
नको त्याला पुष्पहार घालू लागले
देवळात कधीपासून देव
बिचारे पानाफुलांसाठी तरसू लागले...

३.

चांद चांदोळ्याच्या राती
असा वारा थरथरतो
पदराआधी
माझ्या ऊरीचा पाचोळा
त्याच्या नभाळी गरगरतो...

तुझी सय आली
लय वाऱ्याची होऊन
कसा उफणू जोंधळा
माझ्या  पापण्यांच्या टोपलीत
तू बसला जोंधळा होऊन...

४.
ताटाला हुडहुड /कणसाला लुडबूड /शिवारी पाखरु बिंगबिंगला...
मोटेची खडखड/थारोळं गडगड/कांद्याचा डेंगळा डेंगडेंगला...

भल्लरी दुडदुड /पाथीचं थुडथुड/सूर्य गं कासरा वरवरला
कासोटा तड्तड्/विळ्याची वढवढ/बुचुडा ताटाचा चरचरला

झुडुपात झुडझुड/चित्तर तुडतुड/गोफणीनं दगड वंगवंगला
खुरुडं खुडखुण/पिलाची ऊडऊड/पिकात कठाळ्या घुसघुसला

केळीचं घडघड/पानांची गडबड/भुंगा गं कमळ गुंगगुंगला
देठाची झडझड/मिरचीची पडपड/मधीच डिंगऱ्या डिंगडिंगला

डोहात बुडबुड/थंडीनं थुडथुड/झिंगा गं पाण्यात झिंगझिंगला
झाडं झिम्म झिम्माड/मनकवडं मन्नडं/राजबिंडि मुखुटा गुदगुदला

फेट्याची फडफड/ऊसात खडबडं/मागमूस जागीच मुसमुसला
पधराची सडसड/उरात धडधड/गावभर बोभाटा ऊठऊठला
****
तळटीप : वसंत मुरदारे सरांचा पुढचा कविता संग्रह आर्थिक कारणास्तव अजूनही प्रकाशित झाला नाही.'खानदानी कविता' हे त्याचे शीर्षक आहे. 'साहित्याक्षर 'च्या वतीने तो लौकरच प्रकाशित करण्याचा मानस आहे. सदर कवितांची वही गेली अनेक वर्षे संपादकांकडे पडून आहे..


बुधवार, 20 मई 2020

स्त्रीदास्य : काल आणि आज - छाया बेले

स्त्रीदास्य : काल आणि आज - छाया बेले




    भारतीय समाजाला मातृसंस्कृतीचा समृद्ध असा वारसा म्हणजेच, न्याय, समता व शोषणमुक्त व्यवस्थेचा वारसा असूनही या समाजात स्त्रीदास्य अस्तित्वात यावं, आणि ते हजारो वर्षे टिकून राहाव ही अतिशय खेदाची बाब आहे.
 शोषणमुक्त संस्कृतीचे पतन होऊन तिथे
 भेदावर, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण होणं हीच भारतीय समाजाच्या पतनाची सुरुवात म्हणावी लागेल. आदिमानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा आपल्या जन्माला फक्त माता कारणीभूत आहे. असा त्याचा समज होता. शेतीचा शोध स्त्रीनेच लावलेला असल्याने स्त्रियांमध्ये काहीतरी अलौकिक शक्ती अशी त्यावेळी मान्यता होती.  त्यामुळे मातृसंस्कृतीत स्त्रियांचे वर्चस्व सर्वांना मान्य होते. स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती. तिला *गणिका* असे संबोधले जात होते. गणिका म्हणजे गणाची मालकीण आपल्या जमिनीचे आपल्या कुलात समान वाटप करणारी गणराणी. *आम्रपाली* सुद्धा अशीच एक गणराणी होती.
 ती समानतेच्या लोकशाहीच्या तत्त्वावर शासन चालवत असे. त्यामुळेच गौतम बुद्धांनी अनेक राजपुत्रांच्या जेवणाचा निमंत्रण न स्वीकारता आम्रपालीचे निमंत्रण स्वीकारून तिच्या घरी जेवण घेतलं.
स्त्रीही पूजनीय होती त्या काळात जन्माला येणारी मुले ही आईच्या  नावाने ओळखली जात होती. त्या मुलावर आईचा अधिकार होता.कुंतीची मुले ही कौंत्येय किंवा कुंतीपुत्र या नावाने ओळखले जातात हे एक मातृसंस्कृतीचे ठळक उदाहरण होय.
 कुटुंब प्रमुख महिला असायची त्यावेळी माणसामाणसात कुठलाही भेद नव्हता.
 स्त्री ही जन्मदात्री, निर्माती  आहे म्हणून आदरणीय होती. व सगळी सूत्रे सगळे अधिकार तिच्याकडे होते.
या काळातील स्त्रीचं वर्णन करताना
*'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रीमुक्तीचे युद्ध"*
 या ग्रंथात *डॉ. यशवंत मनोहर* पुढीलप्रमाणे वर्णन करतात--
    " इ. स. पूर्व तीन हजार वर्षापर्यंत एकूण जगाच्या पाठीवरील स्त्री मुक्त होती.
 ती पाखरासारखे स्वच्छंदी होती. तिच्या पंखात स्वप्ने होती आणि स्वप्न पुढे मोकळे, असीम आकाश होते. दास्याच्या कोणत्याही बेड्या तिच्या पायात पडल्या नव्हत्या. तिला कोंड्यासाठी सोन्याचे पिंजरे निर्माण करायचे कोणाला सुचले नव्हते. तिचे मन वाऱ्यासारखे सर्व संचारी होते. तिची नजर निर्भय होती. ती स्वावलंबी आणि स्वयंप्रकाशित ग्रहासारखी होती. तिच्या बोलण्यातून अत्तदिपत्वाचा गौरव चहूदिशांनी उधळला जात असे.
 स्त्री ही स्वातंत्र्याची प्रतिमा शोभत होती. तिच्या शक्तीच्या बुलंद आविष्कारातून यावेळी तिचे दळदार माणूसपण बिनधास्त फुलत होते. त्या संपूर्ण माणूसपणाच्या सूर्य पौर्णिमेचा हा झगमगता कालखंड होता.
तिचा दरारा असा होता कि वाघ-सिंहानाही तिच्या शक्तीतुफानाचे कापरे भरले. तिचा आवाज एखाद्या अजिंक्य पराक्रमा सारखा जंगलातल्या काळोखात घुमत राही. आणि वातावरणात थरार भरून जाई.
 संकटे तिच्यापुढे माना खाली टाकत. आणि दिशा नम्रपणे तिला सामोरे येत. शौर्याची गाणी गात तिच्या भरोशावर फुलांचे फुले निश्चिंत होते. त्यावेळी ती जीवनाची आधीनायिका  होती. सूर्य तिच्या स्वातंत्र्याची द्वाही फिरवत उगवत असे. त्यावेळी तिचे स्त्रीत्व असे मुक्तायन झाले होते. तिचे पंख या वेळी कोणी कापले नव्हते. आणि तिच्या उड्डाणाची वाट पाहणाऱ्या आकाशाची कोणी अपहरण केले नव्हते. यावेळी सहासे फुलवीत चाललेला प्रवास होती. आणि या प्रवासाच्या वाटेवर कोणीही अवरोध निर्माण केले नव्हते. या वेळी ती सुंदर निसर्ग सुद्धा होती. आणि प्रकृती तिच्यातून कविता होऊन बोलत होती. ती स्वातंत्र्याचे स्वयंसिद्ध संविधान होती. ती निर्णयस्वातंत्र्याचा यावेळी पूर्ण उपभोग घेत होती. आपल्या पसंतीचे जगणे ती जन्माला घालत होती. मन मारण्याची तिला गरज नव्हती. ती स्वतःच या वेळी स्वातंत्र्याचा राग झाली होती. यावेळी पूर्णता स्वयंशासित माणूस होती.
शेतीचा शोध, कुटुंब आणि विवाह या गोष्टीने तिचे अत्तदिपत्व नष्ट केले ."
अतिशय समर्पक असं वर्णन यशवंत मनोहरांनी केले आहे.
पुढे नांगराचा शोध लागला आणि पुरुषाचं शेतीवर वर्चस्व प्रस्थापित झालं. त्याचबरोबर मूल जन्माला येण्याचा पुरुषाचा सहभाग असतो माणसाला असा बोध झाला आणि स्त्रीचे महत्व कमी होत गेले. पुढे विवाह, कुटुंब, धर्म, वर्ण  जाती  अशा संस्था निर्माण केल्या गेल्या. आणि हे सगळे टिकवून ठेवण्याकरिता स्त्रीला बंदिस्त व गुलाम करून ठेवणे आवश्यक होतं. त्या शिवाय ही व्यवस्था मजबूत होणे शक्य नव्हते.
 हे सगळं साध्य करण्यासाठी स्त्रीचे महत्व कमी करून, तिला हीन दर्जाची ठरवणं आवश्यक होतं. म्हणूनच मग धर्मशास्त्रे  निर्माण केली गेली. त्यातून स्त्रीवर अनेक आरोप करीत तिच्यावर अनेक बंधनांच्या बेड्यात  अडकवले गेले. तिचे सगळे अधिकार काढून घेऊन मूल जन्माला घालण्यासाठी , घर नावाच्या कोठडीत कैद केले गेले .
 तिला दृष्ट, पापी, स्वैर ठरवून स्वातंत्र्याच्या लायक नाही असा आरोप करून अनेक क्रूर कायदे तिच्यावर लादण्यात आले.
उदाहरणासाठी मनुस्मृति मधील *स्त्रियांचे धर्म* पान.क्र. १३४ . या नावाखाली स्त्रियासाठी सांगितलेले  नियम इथे देत आहे.
*बाल्यावस्थेतील मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईने गृहातील एखादे लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये.बाल्यावस्थेत पित्याच्या आधीन होऊन राहावे.तरुणपणी पतीच्या आज्ञेत असावे व पती मरण पावल्यावर पुत्राच्या समाधीने चालावे पण असते तिने कधीही स्वतंत्र होऊ नये.पिता पती किंवा पुत्र यास सोडून राहण्याची स्त्रीने कधीही इच्छा करू नये. कारण यांच्यापासून दूर राहणारी स्त्री दृष्ट झाल्यास आपल्या दोन्ही कुलास निंद्य करिते.पती जरी विरुद्ध असला तरी स्त्रीने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. कुंड,उपकणीं इत्यादी भांडी घासून पुसून स्वच्छ ठेवावी. व खर्चाचा प्रसंग आला असता फार खर्च करू नये.पिता किंवा त्याच्या अनुमतीने चालणारा भ्राता ज्याच्या स्वाधीन करील तो जिवंत असेपर्यंत तिने त्याची सेवा करावी. व मरणानंतर त्याचे अतिक्रमण करू नये. वाग्दान समयी जे तिचे दान केले जाते तेच पतीच्या स्वामित्वाचे कारण होय ( अर्थात वाग्दानानेच ती पतिची वस्तू होते )  तिच्याशी विवाह करणारा पती तिला ऋतू समयी व समय नसताना नेहमी या लोकी सुख देणारा आहे, व त्याची आराधना केली असता तिच्या द्वारा स्वर्गांचा  लाभ होत असल्यामुळे परलोकीही तोच सुख देत असतो.पती  सदाचार  असो की दुसऱ्या स्त्रीवर प्रेम ( इथे त्याचा व्यभिचार नाही तर प्रेम ठरते ) करणारा असो की विद्यादि गुणशून्य असो, तो कसाही जरी असला तरी साध्वी स्त्रीने देवाप्रमाणे त्याची सतत सेवा करावी.स्त्रियास दुसरा यज्ञ नाही, त्याच्या आज्ञेवाचून उपोषणादी  नाहीत व व्रते ही नाहीत. तर ती आपल्या पतीची आनन्य सेवा करी ते तिच्या योगाने स्वर्गलोकी पूज्य होते.
( एकच स्त्री रजस्वला असल्यास किंवा जवळ नसल्यास दुसऱ्या स्त्रीच्या योगाने पतीची यज्ञादि क्रिया जशी होते तशीच स्त्रियांची भरत्या वाचून यज्ञ सिद्ध होत नाही. असा पूर्व वाक्याचा भावार्थ समजावा)पतीसह धर्माचरणाने  संपादन केलेला जो स्वर्गादी उत्तम लोक त्याची इच्छा करणार्‍या साध्वी स्त्रीने जिवंत असलेल्या किंवा मरण पावलेल्या पतीचे येत्किंचितही अप्रिय करू नये. शुभ पुष्पे, मुळे व फळे यांच्या योगाने अल्प आहार करून देहास खुशाल क्षीण करून सोडावे. पती मरण पावल्यावर परपुरूषाची नावही घेऊ नये.मरणापर्यंत तिने क्षमायुक्त व नियमयुक्त होऊन श्रेष्ठ धर्म त्याची इच्छा करीत व पूर्ण ब्रम्हचर्य पाळून  राहावे.
ज्या साध्वी स्त्री आहेत त्यास दुसरा पती करण्याविषयी कोणत्याही शास्त्रात सांगितले नाही.
  आपल्या क्षत्रियादी  दरिद्री हींन पतीस सोडून जी ब्राह्मणादी
 किंवा श्रीमंत पतीचा स्वीकार करते ती लोकांमध्ये नींद्य होते.
 व तिचा पूर्वी दुसरा पती होता असे लोक म्हणतात.
भर्त्यास  सोडून परपुरूषाशी समागम  करणारी स्त्री या लोकी निंद्य होते. व मेल्यावर ती शृगालयोनीमध्ये उत्पन्न होते आणि कुष्ठादी पापरोग तिला पीडा  देतात. मनवानी देह याचे नियमन करून जी स्त्री कायिक वाचिक व मानसिक क्रियांचे आयोगाने आपल्या पती सोडून कधी राहत नाही ती भरत यासह संपादन केलेल्या लोकी जाते.
याप्रमाणे श्रीधर मरणाने स्त्री धर्माचरण आने वाणी व त्याचा निग्रह करून जी आनंदी मनाने पतीची सुश्रुषा करिते तिची या लोकी उत्तम कीर्ती होते व मरणानंतर पतीसह मिळविलेल्या स्वर्गादि लोकास ती जाते*
याच्याच सोबततच खालील ओळीत एक महत्त्वाचा नियम  दिलेला आहे जो पुरुषांकरिता आहे...
 पूर्वी मेलेल्या भार्येस अंत्यंकर्मामध्ये
 अर्थात अग्नीत समर्पण करून गृहस्थाश्रमाकरिता पुत्र झालेला असो की नसो पुनर्विवाह करावा व विधीने पंचायत ज्ञानाचा त्या करू नये तर दुसर्‍या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ती रोज करावे आयुष्याच्या दुसऱ्या भागात विवाह करुन गृहस्थाश्रमात धर्माचे अनुष्ठान करीत राहावे.स्त्रियांना संन्यासवृतीचा अधिकार नाकारताताना पुढील कारण सांगितले आहे.स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचे संस्कार वैदिक मंत्र शिवाय करायचे असतात.स्त्रियांना धर्माचे ज्ञान नसते कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नव्हता वैदिक मंत्र उच्चारला तर पाप नष्ट होते ज्या अर्थी स्त्रिया वैदिक मंत्र उच्चारू शकत नाहीत त्या अर्थी त्या असत्य पापमय स्थितीत राहणाऱ्या आहेत."

    स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नसल्याने त्यांना संन्यासवृत्तीचा अधिकार नाकारला गेला. वेध शिकण्याचा अधिकार कोणी व का नाकारला ?
      स्त्रियांपेक्षा अधिक पापी जगात दुसरे काहीही नाही.. पुरूषांना मोहीम करण्यासाठी परमेश्वराने स्त्रीयांच्या रूपात हडळी निर्माण केल्या आहेत.(४४६. महाभारत)
धर्मशास्त्राच्या पानापानांतून    स्त्रीयांना अपमानीत, लाचार  बनवणारे  त्यांचं माणूसपण नकारणारे व आपली सत्ता, वर्चस्व कायम राहील असे  कायदे, नियम
एवढ्या हिणकसपणे  हे सगळे  तयार केले गेले.
पशू पेक्षाही हीन दर्जा स्त्रीला देण्यात आला.
 हे सगळे नियम नैतिकतेच्या सगळ्या पातळ्या पार करून तयार केले गेले आहेत.
   मानव समुहातील एका गटाला जो मानव समुहाचा अर्धा हिस्सा आहे. त्याला एवढी अमानवीय वागणूक दिली गेली.

मातृसंस्कृतीत ज्या ज्या गोष्टींना प्रतिष्ठा होती त्या गोष्टी हीन अप्रतिष्ठीत ठरवल्या गेल्या..
उदा:
मातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योनीरुपात उपासना केली जात होती.
मात्र धर्मशास्त्रांनी नरकाचे द्वार ठरवून टाकले.
 तिचं चरित्र, शील, पवित्रता , सर्व फक्त योनीशुचितेशी जोडून तिच्या अस्तित्वाचा असा संकोच करण्यात आला.
   तिला  ज्ञानार्जन वर्ज्य  करून आत्मविकास साधण्याच्या वाटा बंद केल्या. स्वर्ग नरक अशा गोष्टींची भिंती दाखवून तिच्या विचार करण्याच्या शक्तीला संपवले गेले. तिच्या वरील अन्यायकारक नियमांचे उदात्तीकरण करण्यात आले.
    तिचे चारित्र्यहनन करणाऱ्या शिव्यांची निर्मिती हे सुद्धा तिला हीन ठरवण्यासाठी जाणीवपुर्वक विकृत मानसिकतेने केलेले आहे.
  या कपटपुर्ण तयार केलेल्या नियमांचा ताराबाई शिंदे यांनी "स्त्री पुरूष तुलना" या ग्रंथात चांगलाच समाचार घेतला आहे.
 *"एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रीयांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुन्यपेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून आयुष्यभर अंधार कोठडीत रहावे त्या प्रमाणे बायका मेल्या म्हणजे दाढ्या मिशा भादरून यावत् जन्मपर्यंत कोठेही अरण्यवासात का राहू नये बरे?एक बायको मेली म्हणजे दहाव्या दिवशी दुसरी करून आणावी असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे तो दाखवा बरे.?
* तुमचा जीव तुम्हाला प्यारा तसा स्त्रियांचा त्यांना नसेल काय?
* जशी तुम्हाला चांगली बायको हवी तसा तिला चांगला नवरा नको का?
दुर्गुणांची उत्पत्ती आधी आपल्या पासूनच झाली. मन मानेल तसे वर्तन करणे.. रांडा ठेवणे , आता रांडा कोण? या कोणी देवाने केलेल्या?  तर तुम्हीच फसवून घराबाहेर काढलेल्या स्त्रीया असतात
  *ताराबाई शिंदे* यांनी अठराशे ब्याऐंशी या सालात  व्यवस्थेचे ढोंग अशा शब्दांत उघडे पाडले.
साहित्याने स्त्रियाबाबतचा जो आकस बाळगला त्याचाही  त्या समाचार घेतात.
धर्मशास्त्रात स्त्रियांचे जसे हीन तुच्छ वर्णन केले तीच परंपरा पुढे मनोरंजनत्मक साहित्याने चालविली.
अशाच स्त्रियश्चरित्र व अशा इतर ग्रंथासारख्या रंजनवादी ग्रंथातून  स्त्रियांचे विकृत मानसिकतेतून केलेल्या चित्रणावर आसुड ओढले आहेत.
 ताराबाई शिंदे सारखी एखादीच क्रांतीकारी,  विचारशील  महिला सोडली तर
इतर सगळ्याजणी एकविसाव्या शतकात ही हे गुलामीचे गाठोडे अगदी विनातक्रार वागवत आहेत.
     हे संस्कार स्त्रियांच्या मनात एवढे रूजले की ते आपल्या भल्यासाठीच आहे अशी त्यांची समजूत झाली.
एकविसाव्या शतकातही बिनदिक्कतपणे
आई कडून मुलीकडे  चांगल्या संस्कारांची शिदोरी समजून गुलामीच्या बेड्या अडकवल्या जातात.
 मात्र आपल्याला गुलाम करणारे विचार आपल्याला मुक्ती देऊ शकत नाहीत हे अजूनही स्त्रीयांच्या लक्षात येत नाही. महत्मा फुले, माय सावित्री, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे
  आज शिक्षणाच्या वाटा मोकळ्या आहेत मात्र  आपण आत्मविकास करू शकलो का हा  चिंतनाचा विषय आहे.
आपल्यात  स्वतंत्र विचार क्षमता विकसित झाली आहे का?
आपण स्वत:ला एक स्वतंत्र व्यक्तीमत्व समजतो का ?
की एखाद्या जात धर्मातील "स्त्री " समजतो ?
जाती धर्म स्त्रियांनी निर्माण केले नाहीत. या  संस्थांनी  स्त्रियांना  गुलामच केले, मग या गोष्टीचा एवढा दुराभिमान का बाळगावा ?
याचा स्त्रियांनी विचार करायला हवा. वैचारिक प्रगल्भता, , निर्णय क्षमता, विकसित करीत आत्मोनत्तीवर लक्ष केंद्रित करायला हवे.आर्थिक परावलंबन हे एक गुलामीचे एक महत्त्वाचे कारण आहे.स्वावलंबी होत महिलांनी आत्मसम्मानाच्या जगण्याचा पुरस्कार करायला हवा.
    धर्मकारण, राजकारण समाजकारण, याचा ताबा फक्त एकाच  समुहाकडे रहावा या हव्यासापोटी स्त्रीला गुलाम   स्त्री- पुरूष नैसर्गिक सहजीवनाचं विकृतीकरण घडवून आणले गेले.
हे सगळं कोणत्याही देवाने केलेले नाही तर माणसाने तयार केलेले नियम आहेत आणि हे माणसानेच ध्वस्त करायला हवेत.
 स्त्रियांनी आपल्या जीवनात काही स्वतंत्र उदिष्ट ठेवून आत्मशोध घ्यायला हवा.
 
*"स्त्री ही जन्मत नाही तर घडविली जाते"* हे *सिमोन द बोहुआर* या रशियन लेखिकेचं वाक्य समस्त स्त्री जीवनाचा सार आहे.
" स्त्रीवर लादलेले निकृष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्या निकृष्टतेचे व दुरावस्थेचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.आजही हे चित्र पालटलेले नाही . ही बाबच खरी क्लेशकारक आहे." हे थोर इतिहास संशोधक आ. ह. साळूंखे यांनी हिंदू संस्कृती आणि स्त्री या ग्रंथात नोंदवलेले मत स्त्रीयांच्या  आजच्या परिस्थितीवर प्रकाश टाकते.
  यावरून स्त्रियांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
   अपमान, उपेक्षा, शोषण, यांची सवय झाली. हा अन्याय आहे असंही वाटत नाही. कारण वर्षानूवर्ष मनावर हेच बिंबविलं गेलंय.
हजारो वर्षांपासून  अंगवळणी पडलेल्या गोष्टी जीवनातून वगळणं सोपं नाही त्या करिता       " भारतीय नारी " हे गुलागिरीचं सोनेरी कवच फोडून बाहेर पडावं लागेल.
हा मार्ग सोपा नक्कीच नाही.
पंडिता रमाबाईंनी एकटीने या व्यवस्थेच्या विरोधात बंड करून स्वत:च कर्तृत्व सिद्ध केले.

   माय सावित्रीलाही या विकृत मानसिकतेने छळलं . मात्र त्यांचं उद्दिष्ट हे स्त्रीला मुक्त करण्याचं होतं.
डॉ.  बाबासाहेब आंबेडकर स्त्रीला माणूस म्हणून जगता यावे यासाठी आजीवन प्रयत्न केले. स्त्रीयांच्या हितासाठी  अनेक कायदे केले.

सद्यस्थिती :

      हे जरी खरं असलं तरी स्त्रीया जो पर्यंत गुलाम मानसिकतेतून बाहेर पडलेल्या  नाहीत.
याची उदाहरणे पावलो पावली बघायला मिळतात.
उपास तापास नवस सायास स्त्रीयाचं करताना दिसतात.
नवरात्रीत दररोज एका नव्या रंगाची साडी नेसून त्यावर मॅचिंग दागीने घालायला मिळाले पाहिजे एवढंच धेय्य असतं.
साडी, दागिने, खाणं, पिणं मिळालं म्हणजे झालं . जन्मभर सेवा करायची, अपमान सहन करायचा. मार खायचा. हे सगळं सहन करणारीला मग चांगली म्हटलं जातं. आशिलाची लेक एवढा त्रास काढून नांदली वगैरे..
एवढं म्हणून घेण्यासाठी बायका सहन करीत जातात.
 माहेरातूनही सांगितलेलं असतं की
" नांदून नाव कर नाहीतर मरून नाव कर मात्र परत फिरून येवू नकोस. बापाच्या पागोट्याची शान राख. " ही सद्यस्थिती आहे. मग तिच्या पुढे दोन पर्याय असतात. एक सहन करणं, दुसरं जीव देणं.
नवरा म्हणजे देव , त्याच्या आधी जेवायचं नाही . गळ्यात मंगळसूत्र नसेल तर पाणी सुद्धा प्यायचं नाही.
  नवऱ्याला अहो- जाहो म्हणायचं . नाव घ्यायचं नाही. उलटं बोलायचं नाही. प्रश्न विचारायचे नाहीत. पैशाचा हिशेब विचारायचा नाही.
 हुंडा कमी म्हणून छळ . दररोज माहेरच्यांचा पाणउतारा.
हे सगळं तिला निमूटपणे ऐकून घ्यावच लागतं.
कारण आता माहेर परकं झालेलं असतं . पुढ्यात जे येईल त्याला तोंड देणं भाग असतं.
ग्रामीण भागातच नाही तर नोकरी करणाऱ्या मध्यम वर्गीय सुशिक्षितांच्या  घरातही उच्चशिक्षित स्त्रीयांची हीच अवस्था आहे.
 लहाणपणापासून होणाऱ्या संस्कारांनी त्यांना आधीच व्यवस्थेपुढे शरणागती पत्करायला लावलेली असते.
तिच्या शिक्षणाची किंवा तीची माणूस म्हणून काही मोल नसतं.
हेच आई पुढे मोठ्या अभिमानाने आपण कसा त्रास काढला यातून इथवर आलो. आज सगळे आपला आदर करतात हे  आपल्या मुलीला सांगते  व तू माझं नाव कर असं भावनिक आवाहन करते . असा हा वारसा पिढी दर पिढी चालत राहतो.
वरून सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत म्हणून ओरड केली जाते मात्र या कायद्याचा लाभ किती महिला घेतात.हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
सामाजिक दडपणामुळे या महिला कायद्यापर्यंत पोहचू शकत नाहीत.
हे झालं घरात राहणाऱ्या महिलांसाठी घराबाहेर पडून नोकरी , व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही या पुरूषसत्ताक मानसिकतेला सामोरं जावं लागतं. सहकारी किंवा वरीष्ठाकडून सन्मानाची वागणूक मिळेलच असे नाही. काही वेळा त्यांच्या नैतिक -अनैतिक
इच्छा थोपण्याचाही प्रयत्न केला जातो. तिने ते धुडकावून लावले तर मग अडवणूक करणे , इतर कारणांसाठी त्रास देणे , ब्लॅकमेल करणे , टिंगल टवाळी करणे , चुकीच्या गोष्टी पसरवणे अशा गोष्टी केल्या जातात.
हे सगळं  का होतं, तर याच्या मुळाशी तीला भोगवस्तू समजणारी पारंपारिक मानसिकता कारणीभूत आहे.
तिचं कर्तृत्व ,तिची बुद्धिमत्ता, विद्वत्ता यांच्याशी काही देणंघेणं नसतं . ती माणूस आहे याच्याशी तर दूरदूर पर्यंत संबंध नसतो. इथे फक्त तिचं शरीर हीच तिची ओळख असते. एकविसाव्या शतकात माणूस ही मानसिकता घेऊन जगतो ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे.
 संविधानाने सर्वाना समान अधिकार दिले असले तरी
महिलांना वारसाहक्क मिळत नाही. त्याकरिता व त्या अश्रीतासम जीवन जगतात
   काही दिवसांपूर्वी metoo या द्वारे अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या शोषणाविषयी, अन्यायाविषयी बोलत्या झाल्या.
अनेकिंच्या मनात  बराच काळ आत घुसमटत राहिलेलं याद्वारे बाहेर पडले.
हे सुरू असताना समाजमाध्यमातून त्यावर येणारी मतं चर्चा या आजही स्त्रीच्या बाबतीत पुरूषसत्ताक मानसिकतेत तसूभरही बदल न झाल्याच्या निर्देशक होत्या.
'  ती आधी कशी काय तयार होते ? किंवा चांगल्या माणसाला बदनाम करतात या , दोघांच्या मर्जीने झालेलं असतं.‌ '
याही पेक्षा अजून खूप खालच्या दर्जाची भाषा असायची‌‌.
 हे असं का ? काम मागायला गेलं म्हणजे तिच्या जवळ फक्त शरीराचीच  मागणी करायची असते का?  इतर कोणत्याही क्षमता तिच्यात नसतात. तिचं काम बघून निवड का केली जाऊ नये ?
वरून समाज तिला दोषी ठरवून मोकळा . ही स्त्रीला दासी समजणारीच मानसिकता आहे.
    चित्रपट किंवा मालिका मधून  हेच विचार पुढच्या पिढ्यापर्यंत पोहचवले जात आहेत.
सहन करीत जाणारी, निर्णय न घेणारी दुसऱ्याच्या विचारांवर चालणार आदर्श सुन, शिकलेली स्त्री वाईट, चारित्र्यहीन दाखवली जाते. हे सगळं नवीन स्वरूपात जमाजमनावर बिंबविलं जात आहे.
खानदान की इज्जत,   या व अशा संकल्पना अजून मजबूत करून तिच्या पायातील बेड्या  मजबूत केल्या जाता आहेत. या संकुचित विचारांतून आपल्या समाजात आजही अॉनर किलिंगच्या घटना घडून येतात.
  माणूस म्हणून आपण नेमके कुठे चाललोय यांचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
  स्त्री - पुरुष  हे एकमेकांना पूरक आहेत . शरीररचना ही वेगळी असणं हे सर्वच प्राणीमात्रांना प्रजननासाठी निसर्गानेच निर्माण केली आहे. त्यावरून कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरू शकतं नाही.
या वेगळेपणाच्या विचारामुळे स्त्री पुरुष दोघेही एकमेकांपासून दुरावले गेले आहेत.
एकाकी पणाचे शिकार झाले आहेत. यावर मात करण्यासाठी विवेकशील पुरुष मंडळींनी समतेवर आधारित समाज रचनेकरिता पुढाकार घ्यायला हवा . ही काळाची गरज आहे.

ही दास्यत्वाची - स्वामित्वाची भावना नष्ट होवून  पुरुष जेव्हा तिचं माणूसपण मोकळ्या मनाने स्विकारेल तेव्हा समाजात अस्वस्थता उरणार नाही.




 तो पर्यंत
स्त्रीदास्य टीकून राहील. सोबत सगळ्या शोषक संस्थाही !!


- छाया बेले,नांदेड








*संदर्भ*:
१) स्त्री पुरुष तूलना ( ताराबाई शिंदे)
२) स्त्री आणि हिंदू संस्कृती ( आ. ह साळूंके)
३) श्रीमनुस्मृति
४) हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती
५) डॉ. आंबेडकर आणि स्त्रीमुक्तीचे युद्ध ( डॉ.यशवंत मनोहर )
६) निर्ऋती ( अशोक राणा)

सोमवार, 18 मई 2020

मतकरींची 'लोककथा' आमच्या परिसरातली.. : डॉ. जगदीश कदम






मतकरींची'लोककथा'
आमच्या परिसरातली..

मराठीतील एक प्रयोगशील नाटककार रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले.
आम्ही एकदम भूतकाळात गेलो.
मतकरींचं 'लोककथा ७८' हे नाटक गाजत होतं,तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो.
अभ्यासक्रमाला नुकतंच हे नाटक लागलं होतं.आम्हाला 'मराठी वाड़मयाचा इतिहास'हा विषय शिकवणारे नरहर कुरुंदकर गुरुजी यांनी रंगभूमीच्या संदर्भातील विवेचक प्रास्ताविक केलं आणि 'लोककथा ७८'या नाटकाच्या अध्यापनाची जबाबदारी दत्ता भगत सरांकडे सोपवली.
भगत सरांनी या नाटकाच्या संहितेतील प्रयोगशीलता,पारंपरिक रंगभूमीपासून हे नाटक कसे वेगळे आहे वगैरे वेगवेगळी उदाहरणे देऊन सांगितले.
याच दरम्यान या नाटकाचे कथाबीज नांदेड परिसरातील आहे आणि मतकरींनी त्या परिसराला प्रत्यक्ष भेट दिलेली आहे,असे कळले.
त्यामुळे 'लोककथा ७८' या नाटकाच्या लेखन निर्मिती प्रक्रियेविषयी आमची उत्सुकता कमालीची ताणली गेली.
विद्यार्थी दशेपासूनच आमच्यात लेखनाचा किडा होता.तो स्वस्थ बसू देत नसे.या ऊर्मीतून लेखन घडे.त्याकाळी 'माणूस' नावाचं साप्ताहिक विशेष चर्चेत होतं.श्री.ग.माजगावकर हे व्यासंगी आणि तटस्थवृत्तीचे  संपादक.वस्तुनिष्ठ आणि ताज्या घटनांवरील मजकूराला आवर्जून प्रसिध्दी देण्याचं त्यांचं धोरण.नव्या लिहिल्या हातांचा शोध घेण्याची निकोप दृष्टी‌.
नाईक हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच भागात म्हणजे विदर्भ-मराठवाडयाच्या सीमा प्रदेशात दरोडेखोरांनी हैदोस घातलेला होता.आमच्या गावात दुकानात झोपलेल्या देवराव कदम यांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली.या मारहाणीत त्यांचा पाय मोडला.या घटनेचा वृत्तांत आम्ही माणूस कडे पाठविला.दुस-याच आठवड्यात मुखपृष्ठ कथा म्हणून 'माणूस' मध्ये तो छापून आला.माणूस हे साप्ताहिक कुठल्याही बसस्थानकावर अथवा पुस्तकाच्या दुकानात सहज मिळत असे.या साप्ताहिकाचा वाचकवर्ग मोठा होता आणि तो सर्व स्तरातला होता.आम्ही या साप्ताहिकाचे नियमित वाचक होतो.या मागची प्रेरणाही तशीच होती.
काही दिवसांपूर्वी नायगाव जवळील बेटक बिलोली येथे एक भयंकर घटना घडली होती.कोळी समाजातील एका कुटुंबावर गावगुंडांनी हल्ला चढविला होता.मिलिंद आठवले नावाच्या आमच्या मित्राने कोळी कुटुंबावर  झालेल्या या अत्याचाराचा वृत्तांत 'माणूस'कडे पाठवला आणि तो लगोलग प्रसिध्दही झाला.एका मिलिटरी मध्ये असलेल्या माणसाला हातपाय बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न गावगुंडांनी कसा केला,याची अंगावर शहारे आणणारी ही जिवंत स्टोरी होती.
ही स्टोरी रत्नाकर मतकरींनी वाचली
आणि त्यावर त्यांनी 'लोककथा ७८' हे नाटक लिहिलं,असं सांगितलं जातं.ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांच्या 'मराठी रंगभूमीचा १९९० पर्यंत चा इतिहास' या ग्रंथात तशी ओझरती नोंद आलेली आहे.आठवले हे आमचे मित्र असल्यामुळे आम्ही खूप वर्षांपूर्वी या बाबींची खातरजमा करून घेतली आहे.'लोककथा७८' या नाटकाचं कथाबीज नांदेड जवळील नायगाव परिसरातील बेटक बिलोलीचं.या नाटकाचा एक प्रयोग सुध्दा या गावात झाला.रत्नाकर मतकरी यांनी या गावाला भेट दिल्याचंही कळलं.
तिस-या रंगभूमीवरचं हे एक अत्यंत महत्त्वाचं नाटक.रंगभूमीचे पारंपरिक संकेत झुगारून देणारं.प्रेक्षकांमधून पात्रांचा प्रवेश ही जशी या नाटकाची खाशियत तशीच ताज्या विषयाची उत्तम मांडणी हे या नाटकाचं अंगभूत वैशिष्ट्य.सेवादलाच्या माध्यमातून या नाटकाचे अनेक प्रयोग झाले.काही भारतीय भाषांमधून हे नाटक आलं.अर्थात हे नाटक म्हणजे रिपोर्ताज वगैरे असल्याचा शेरा मारायला तत्कालीन पठडीतले समीक्षक कमी नव्हते,हे वेगळं सांगायची गरज नाही.
 'लोककथा ७८' ची कथा ही नांदेड परिसरातील आहे,याची वाच्यता नाटककाराने फारशी कुठं केल्याचे ऐकिवात नाही.परंतु 'लोककथे'तील भळभळतं वास्तव हे  आमच्या गावपरिसरातील आहे,यांची जितीजागती जाणीव आमच्या स्मृतिकोशात अद्याप जपून ठेवलेली आहे.
या दृष्टीने रत्नाकर मतकरी यांचा नांदेडशी वेगळा अनुबंध होता‌.
त्यामुळे मतकरींच्या जाण्याचे दु:ख आम्हा नांदेडकरांसाठी अत्यंत वेदनादायी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!

- डॉ.जगदीश कदम, नांदेड



शनिवार, 16 मई 2020

जगाच्या पोशिंद्याची आर्त हाक : : डॉ.प्रतिभा जाधव

जगाच्या पोशिंद्याची आर्त हाक : 'काळ्या आईची तहान
-----------------------
 (काव्यसंग्रह- "काळ्या आईची तहान" द्वारा- गाव प्रकाशन,औरंगाबाद)*कवी - राजेंद्र दिघे ,मालेगाव)

     अवघ्या जगाला संजीवनी देणारा बळीराजा स्वतःच बळी ठरत असलेला हा आजचा कडू काळ. ह्या कडू काळात जगाच्या पोशिंद्याची व्यथा-वेदना, अस्वस्थता कवी राजेंद्र दिघे यांनी काव्यसंग्रहात जोरकसपणे मांडली आहे. जगासमोर शेतकऱ्याच्या यातना, ससेहोलपट अगदी प्रामाणिकपणे 'काळ्या आईची तहान' मधुन मांडलेली दिसते.
        'काळ्या आईची तहान' (प्रथम आवृत्ती) हा काव्यसंग्रह गाव प्रकाशन, औरंगाबाद यांनी सन २००९ मध्ये प्रकाशित केला आणि ह्याच काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती दि.२४ डिसेंबर २०१३ रोजी प्रकाशित झाली आहे. या द्वितीय आवृत्तीच्या अवलोकनानंतर या काव्यसंग्रहाबद्दल काही लिहावे असे मनापासून वाटत होतेच.
      शिक्षक असणाऱ्या कार्यकर्त्या कवीची थेट काळजातून आलेली ठसठस म्हणजे 'काळ्या आईची तहान' मधील कविता असे प्रथमदर्शनी मला जाणवले. या काव्यसंग्रहात एकूण ६० कविता असून बहुतेक कविता ह्या शेतीमाती, शेतकऱ्याची करूण कहाणी, दुष्काळ, पाण्याची प्रतीक्षा, पिकांना मिळणारा बेभाव अशा आशयाच्या आहेत. कवी शिक्षकी पेशातील असला तरी त्याची पाळंमुळं ही शेतकरी कुटुंबाशी, मातीशी अतूटपणे जोडलेली आहेत. शेतकऱ्याच्या आयुष्यातील सारे उन्हाळे-पाणकळे राजेंद्र दिघे यांनी बालवयापासून जवळून सोसले, अनुभवलेले आहेत त्यामुळे त्यांच्या कवितांमधून ते प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही. जातीय सामाजिक भेदाभेद, अन्याय,भ्रष्टाचार हेही त्यांच्या कवितांचे विषय आहेत.
    या काव्यसंग्रहास ज्येष्ठ कवी आदरणीय कमलाकर देसले म्हणजेच आम्हा लिहित्या लोकांचे 'आबा' यांची अत्यंत अभ्यासकपूर्ण,बोलकी अशी प्रस्तावना लाभलेली आहे. त्यात पहिल्याच परिच्छेदात त्यांनी लिहिलेले "बहुजन समाजाच्या हाती कर्माच्या साधनांबरोबर ज्ञानाचे, साहित्याचे साधन आले,लेखणी हातात आली"   त्याचप्रमाणे "काव्यसंग्रहाच्या शिर्षकावरूनच कवीच्या चिंतेचा आणि चिंतनाचा पैस लक्षात येतो. या कार्यकर्त्या कवीची कविता स्वतःचा चेहरा घेऊन साहित्य रसिकांशी या संग्रहातून हितगुज सांगते."(पृ.१०) ही प्रस्तावनेतील विधानं कवी व कवितेविषयी महत्वपूर्ण वाटतात.
       काव्यसंग्रहाच्या प्रारंभी असलेल्या कवीच्या मनोगतातून कवीची लेखनामागील प्रेरणा, प्रांजल भूमिका अनुभवास येते. त्यात कवी राजेंद्र दिघे यांनी लिहिलेली "मातीतूनच नाती जोपासली जातात, त्या मातीचं देणं लागतो ही भावना संवेदनशील मनाला स्वस्थ बसू देत नाही, अस्वस्थतेच्या वेदनांतून शब्द फुटतात त्या अनुभवांचे गुज उमलणारी काव्यभावना या काव्यसंग्रहातून व्यक्त झाली आहे." ही वाक्ये एका पद्धतीने त्यांचे कवी म्हणून अंतरंगच उलगडून दाखवते.(पृ.५)
काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ विलक्षण बोलके आहे.
      या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता कवीच्या अहिराणी मायबोलीतील असून अर्थात 'शेतकरी' असे तिचे शीर्षक आहे. ऊनवाऱ्यातील, जीवाला शीण आणणाऱ्या कष्टाला सामोरे जाणारा शेतकरी ते पिकाला जीवापाड जपत घरातील धान्याची भरलेली कणगी पाहणारा शेतकरी हा प्रवास अवघ्या १४ ओळीत मांडताना ते लिहितात की,

*'ऊन वाराना या दिन*
*शेतकरीना जीवले सिन*
*घाम नितरस अंगभर*
*तवय लागस नांगर*
कवितेच्या अखेरच्या भागात ते म्हणतात,

*दिसंस डोयाले वानगी*
*जवयं भरी धान्यानी कणगी*
*काया मायना ह्या लेकरं*
*तवय व्हतस बिनघोर* (पृ.१५)

   याच अहिराणी बोलीतील 'हुंडा' (पृ.४३) ही कविता या संग्रहात वाचायला मिळते.या काव्यसंग्रहात छंदोबद्ध काव्य आहे तसेच मुक्तछंदातील काव्यही आहे. इथल्या व्यवस्थेवर, लोकशाहीतही सत्तेतून नांदणाऱ्या हुकूमशाहीबद्दलचा रागही ते आपल्या 'सत्ता' (पृ.१८), 'सारे काही इथलेच' (पृ.२०) यांसारख्या कवितांतून व्यक्त करताना लिहितात की,

*'पारतंत्र्य गेलं स्वातंत्र्य आलं*
*हुकूमशाहीशिवाय कुणीच बोलेना*
*माजलेत गुंड झाले सारे दांड*
*सत्तेपुढे शहाणपण कधीच चालेना* (पृ.१८)

*'इथलेच जिणे इथलेच बहाणे*
*लोकशाहीमध्ये उरले थोडे शहाणे* (पृ.२०)
 
   अस्मानी-सुलतानी संकटाचा जगात पहिला बळी जर कुणी असेल तर तो शेतकरी असतो. पूर येवो वा दुष्काळ-अवर्षण त्याची पहिली झळ बसते ती बळीराजाला म्हणून कवी आपल्या 'पूर' या कवितेत म्हणतो की,

*सारं रान भिजलं*
*माळरान भिजलं*
*तुह्या या येण्याने*
*सारं आभाळ फाटलं*
*कसं बसला हा बाप?*
*दुःख घेऊन उरात*
*नाही उरलं सरलं*
*मह्या बापाच्या घरात...* (पृ.२६)

'ओला पाऊस' या कवितेतून कोरड्या आषाढातील आपली इवली प्रामाणिक इच्छा कवी मांडताना लिहितो की,

*'आषाढ श्रावणात*
*भरल्या नभाला*
*थेंब थेंब पाण्याचा*
*पाझर फुटावा...*
*जसं नवसानं आलेला*
*नक्षत्राने दिलेला*
*ओल्या पावसानं*
*भिजलेला समुद्र दिसावा...* (पृ. ३३)

पिकाला भाव नसताना साधं भांडवलही जेव्हा सुटत नाही तेव्हा शेतकऱ्याची जी तगमग होते ती कुणीच समजून घेऊ शकत नाही 'ज्याचे जळते त्यालाच कळते' या म्हणीप्रमाणे भाव नसताना अभावच वाट्याला आलेला शेतकरी वर्षं कसं काढावं? चूल कशी पेटावी? या प्रश्नांनी बेजार होतो. हीच भावना 'भूक' या कवितेत मांडताना कवी लिहितो की,

*'दिसं रातीच्या कष्टामधी*
 *हरपली भूक*
*उन्हामंधी तापलेल्या*
*विस्तवाची झालीया राख*
*भुईच्या मातीला*
*पिकली रताळी*
*भावावीण व्हईल*
*कशी ही दिवाळी*
*दिव्याच्या वातीला*
*नव्हतं तेल*
*कशी ही धावेल*
*जीवनाची मेल?* (पृ.३५)

निसर्गाने, व्यवस्थेने त्रस्त शेतकऱ्याची हिच हतबल भावना आपल्या 'व्यथा बळीराजाची' या कवितेत कवी चितारतो की,

*'बाप मह्या हा आसवं गाळत*
*बसला बांधाला...*
*कोपीमंधी उरलं नाही*
*दाणं कणगीला*
*पोर झाली ती जवान*
*उद्या लग्नाला,*
*रान इकावं पैशासाठी*
*तिच्या हुंड्याला...* (पृ.३६)

ह्याच वेदनेचा धागा पुढे नेत शेतकऱ्यास कापूस पिकवताना ,कष्टताना, अतोनात राबताना आलेलं मरण कवी 'मातीतलं मरण' या कवितेतून व्यक्त करताना लिहितो की,

*गेलं दिसामागून दिसं*
*बाप बसला साहत*
*पंधरा तीन त्या वारात*
*तोल मापाच्या नादानं*

*उरली कोरकी भाकर*
*गेली भात्यात सरून*
*थंडीच्या लाटेत*
*आलं अंग हे भरून*

*कष्ट करत करत*
*जसं पेटलं सरण*
*दिलं अंगाला झोकून*
*आलं कापसातच मरण* (पृ.५२)
शेतकऱ्याची ही वाताहत वाचकास विषण्ण करून जाते. कवीच्या लेखणीत वेदना मांडण्याचे सामर्थ्य या कवितेतून स्पष्टपणे जाणवते.

मोलमजुरी करणाऱ्या सतत अन्यायाचे बळी ठरणाऱ्या उपेक्षित जीवांबद्दलची तळमळ आपल्या 'जीवन' या कवितेत व्यक्त करताना ते म्हणतात की,

*'तहान भूक भागवण्यासाठी*
*जीवाचे रान करणाऱ्या*
*कष्टकऱ्याना घामाचा*
*दाम तरी मिळेल का?*

*सतत अन्यायाच्या छत्राखाली*
*वावरणाऱ्या निरपराध*
*निष्पाप जणांना*
*न्याय कुणी देईल का?* (पृ. ३९)

पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याची पावसाची आस आणि पावसाचाच ध्यास 'काळ्या आईची तहान' या शीर्षक कवितेतून व्यक्त करताना कवी राजेंद्र दिघे म्हणतात की,

*'वाळत चाललं*
*काया मातीतलं उभं ताट*
*कवा वाहिलं वाहिलं*
*पाऊस पाण्याचा ह्यो पाट*

*भेगाळली काळी आई*
*तिची तहान कधी जाई*
*कवा वाहिलं वाहिलं*
*पाऊस पाण्याचा ह्यो पाट'* (पृ.५४)

मालाला मिळणारा कवडीमोल भाव, किमान गुंतवलेले भांडवलही हातात पडू नये इतकी संतापदायी तेवढीच हतबल परिस्थिती, पतपेढ्या- सावकाराकडून घेतलेले कर्ज, नात्यागोत्याकडून घेतलेली उसनवारी,मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, वर्षभराच्या अन्नपाण्याची तजवीज, पुढील लावणीसाठी हाती असणारी शून्य रक्कम ही सारी संकटे एकदाच शेतकऱ्यावर कोसळतात. सारे प्रश्नच भोवताली दिसू लागतात, भूकतहान उडवतात तेव्हा जगण्यापरिस या शेतकऱ्यास मरणे सोपे वाटू लागते आणि गळफास खुणावू लागतो हेच भयावह , विचारशील करणारे चित्र कवी आपल्या 'गळफास' या कवितेतून मांडतो की,

*'लई झालंय वझं*
*सावकाराचा त्रास*
*अन मह्या बाच्या गळ्यात*
*गळफास...*

*काया मातीला नाही ठावं*
*आभाळ भरल्या थेंबाचा घास*
*तवा जाईल कसा ह्यो*
*बाच्या अंतरीच्या जखमेचा वास*
*अन मह्या बाच्या गळ्यात*
*गळफास...* (पृ.५६)

पावसाला आळवत कवी आपल्या 'पावसा' या कवितेत म्हणतो की,

*'अरे पावसा पावसा*
*व्हऊ दे रे थोडी माया*
*चिडी-मुंगी, पाखराचे*
*डोये लागले आभाया'* (पृ.६७)

पाणी बरसावं म्हणून नवस करून थकलेल्या शेतकऱ्याचे दुःख मांडताना 'तू यावं म्हणून'  या कवितेतून कवी म्हणतो की,

*'तू यावं म्हणून*
*लई नवस केले*
*तुही वाट पाहण्यात*
*लई दिस गेले* (पृ.६८)

'पाऊस' (पृ.७३) या कवितेतून पावसाची नानाविध रूपे कवीने मांडलेली आहेत. तशीच आर्त भावना 'घास' या कवितेतही मांडलेली आहे.

*'उदास राने ओसाड वाटे*
*दुभंगली मने आसवं दाटे*
*वाळली पाने भकास झाडे*
*उपाशी जिणे गळा घास आडे'* (पृ.७४)

उल्हसित करणाऱ्या श्रावणात बळीराजाही आनंदून उठतो, हिरव्यागार पृथ्वीची स्वप्न त्यास पडू लागतात. या श्रावणाबद्दल 'श्रावणातला पाऊस' या कवितेत कवी म्हणतो की,

*'श्रावणातल्या पावसानं...*
*कसा सडा शिंपडावा*
*झाडाझाडाच्या फांदीत*
*हिरवा चुडाच भरावा!'*(पृ.४६)
यातील हिरव्या चुड्याची प्रतिमा वाचकाच्या डोळ्यासमोरही श्रावण उभा करते. तसेच वसंतात शेतकरी कवीच्या मनातील भाव 'आला वसंत' या कवितेत वाचायला मिळतात ते असे,

*'आला वसंत वसंत*
*ऋतुराजाची पसंत*
*धुराळती नवे रंग*
*लाल पिवळ्यात दंग'* (पृ.५५)

ऋतू बदलतो , दिवस पालटतात, कपाळाच्या आठ्या पावसाबरोबर मावळतात. घन बरसू लागले की शेतकऱ्याच्या वाळवंटी जगण्याला कुठेतरी हिरवी पालवी फुटू लागते. हिच भावना आपल्या 'धरणीमाय' या कवितेतून कवी पुढीलप्रमाणे मांडतो,

*'चिंब भिजल्या सरीत*
*माय रानात हसली*
*कोंब उगल्या मातीत*
*पानं हरित दिसली*

*आला मिरूगाचा पाणी*
*धन्यानं कंबर कसली*
*गाऊ रानावर गाणी*
*माय धरणीची ओटी भरली'* (पृ.६४)

मृग बरसताच कवीला आपल्या मायबापाच्या डोळ्यात अमाप हासू,आनंद दिसू लागतो.तो आनंद टिपताना कवी लिहितो की,

*'माय म्हणे कशी*
*रानामंधी मोर नाचला*
*शेतशेतात या...*
*मृग बरसला*
*मह्या बाच्या डोयांत*
*आनंद दिसला*
*वादळात या...*
*मृग बरसला*(पृ. ६५)

ही कविता वाचताना वाचकाच्या मनातही मृग बरसल्याशिवाय राहात नाही हे या कवितेचे वेगळेपण आहे.

शेतीमातीच्या कविता 'काळ्या आईची तहान' या काव्यसंग्रहात आहेत त्याचप्रमाणे मानवी जीवनाशी निगडित विविध विषय या कवितांतून पाहायला मिळतात. आईविषयीची कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविताही यात आहेत. त्यापैकी 'आईविना' ह्या कवितेतील

*'जळणाऱ्या चितेत जेव्हा*
*माझी आई....*
*लख्ख कोळसा होतेय तेव्हा*
*शरीर सुन्न होतं अन मनही'* (पृ. ७१)

या ओळी वाचून अंगावर रोमांच उभे राहतात आणि मन कमालीचे हळवे होते.

कवीचे आईवरील नितांत प्रेम या काव्यसंग्रहातील अनेक कवितांतून ठळक दिसते. 'आईचे प्रेम' या कवितेत कवी  म्हणतो की,

*'किती सोसले दुःख तू*
*माया तुझी आम्हावरी*
*कष्ट केलेस दिस राती*
*आई तूच या जगता खरी* (पृ. ६९)

आईचं 'नसणं' किती वेदनादायी असतं याची कल्पना 'आई' या कवितेतून आपणास येते. त्यात कवी म्हणतो की,

*'गाय गोठ्यात पाहुनी*
*मनी दाटे भावना*
*माझ्या प्रेमाची आई*
*कधी फिटे गं कामना'*(पृ.५१)

आज जगरहाटीस सरावलेल्या मुलाला आईच्या त्यागाचे श्रमाचे चटके समजू लागले आहेत. तिची दुःख किती मोठी आभाळाएवढी होती, तरीही तिने कधी तक्रार केली नाही की ती कधी खचली नाही. तिच्या त्यागमय मूर्तीविषयी कवी लिहितो की,

*'वेदना सोसताना*
*आठवतात आजही ते दिवस*
*आईला झालेल्या जखमांचे*

*अनवाणी चालताना*
*आठवतात आजही ते दिवस*
*आईला टोचलेल्या*
*विषारी काट्यांचे* (पृ.२८)

राजकारण, सत्ता, विविध मानवी प्रवृत्ती यांवर भाष्य करणाऱ्या इतर कविताही यात आहेत. विविध प्रसंगानुरूप शिक्षक,सहकारी,महापुरुष यांच्याविषयी लिहिलेल्या कविताही या संग्रहात आहेत. उदा. निरोप देताना (पृ.७६), नाना (पृ.६६), मैत्री (पृ. ६२), तू जाताना (पृ.६०), माझ्या कवितेत (पृ.६१), शिस्तीचा स्तंभ तूच खरा (पृ.५०), स्मरा रे स्मरा (पृ.४९), इथे जन्मली व्यथा (पृ.४७) इत्यादी.

कवी राजेंद्र दिघे यांच्या काव्यसंग्रहातील शेवटची कविता मात्र मला सार्वकालिक वाटते. सांप्रतकाळात तर ती चपखल बसते. सत्तेसाठी 'काहीही' ही वृत्ती जोवर इथल्या विविध पक्षांत व नेत्यात आहे तोवर घटनेची पायमल्ली करण्याचा गुन्हा येथील सत्ताधारी करत राहतील. संविधानातील मार्गदर्शक तत्वांनाचा हरताळ फासून आपणच सच्चे देशभक्त हा दांभिकपणा सुरूच राहील. गोरे राज्यकर्ते गेले ,काळे आले आणि जनतेचस आणखीच दैन्य आले. धर्मनरपेक्षता, बंधुभाव या संविधानिक मुल्यांना सुरुंग लावणारी विघातक प्रवृत्ती आज बोकाळतेय म्हणून इथल्या नेत्यांना, राज्यकर्त्यांना कवी जाब विचारतो की,

*'एवढ्याचसाठी काय?*
*बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेनं तुम्हाआम्हास स्वातंत्र्य दिले?*
*समता,स्वातंत्र्याच्या नावाखाली*
*एकताच सारी आटवली*
*धर्मनिरपेक्षतेचा आव आणून*
*बंधुभावाची सर्वधर्मसहिष्णूता बाटवली* (पृ. ७९)

एकंदर कवी राजेंद्र दिघे यांची कविता ही वर्तमानकाळाशी प्रामाणिक अशी कविता आहे. किरकोळ व्याकरणीक त्रुटी या संग्रहात आहेत परंतु त्यांचा कवितेवरील आशयावर विशेष प्रभाव पडत नाही. तसेच कवितांचा क्रम आशय-विषय अनुरूप सुयोग्य पद्धतीने लावता आला असता असे कविता वाचताना लक्षात आले. पुढील काव्यसंग्रह करताना कवी या लहानसहान बाबींकडे सजगतेने बघेल ही खात्री आहे. या कविता नवीन विचार देणाऱ्या आणि विचार-भावना यांच्याशी प्रामाणिक आहेत. त्यात कुठेही शब्दांची जुळवाजुळव वा कृत्रिमता नाही. प्रामाणिक व पारदर्शी अशा ह्या कविता आहेत. उत्तरोत्तर अधिक सकस व सभोवतालास सजग करणाऱ्या कविता कवी राजेंद्र दिघे यांच्या लेखणीतून निपजो हिच मनापासून सदिच्छा देते आणि थांबते!
----------------------
-- *प्रा.डॉ.प्रतिभा जाधव*
*(समीक्षक,वक्ता,साहित्यिक,एकपात्री कलाकार)*
*नाशिक*
pratibhajadhav279@gmail.com

राजेंद्र दिघे
+91 94216 00711

बुधवार, 13 मई 2020

आणि गूज मनीचे... : नितीन माधव, मुंबई




आणि गूज मनीचे...

ब्रेकींग न्यूज, एव्ही, एव्हीबी, डब्लुकेटी इत्यादी...दिवसभर बातम्यांच्या भडिमारात एखाद्या घटनेवर 'मी' म्हणून व्यक्त होणं राहून जातं. बातमीदाराऐवजी एक व्यक्ती म्हणून त्या घटनेविषयी काय वाटतं हे जरा मागे पडत जातं. हे केवळ माझ्या किवा कुणा एकाच्याच बाबातीत नव्हे तर प्रत्येकाच्या बाबतीत घडत असावं कदाचित... मग एखाद्या निवांत क्षणी आपलेच आपल्याला प्रश्न पडू लागतात की...एखाद्या मंत्र्याला जगण्यासाठी 15 ते 20 प्रशस्त बंगले, 20 ते 30 आलिशान गाड्या, कोट्यवधीचे घोटाळे करून गोळा केलेला बँक बॅलेन्स आणि गोत्यात आल्यास इतरांच्या मदतीची पर्यायानं 'बळा'ची गरज का पडावी ? हे झाल राजकारणी मंडळींचं.

तरुणाईचं म्हणाल तर...ही कोण मंडळी आहेत जी आधी प्रेम करतात. नंतर प्रेम नाकारणाऱ्या व्यक्तीवर अमानुष हल्ला करतात, अॅसिड टाकून चेहरा विद्रुप करण्यात धन्यता मानतात ?

ज्या बालवयात मुलांना घडवण्याची गरज असते त्या वयात ती बिघडून एकमेकांना भोकसल्याच्या बातम्या य़ेऊन थडकतात.

टीव्हीवरील 'क्राईम शो'ना मिळणारा टीआरपी, हिंसक आणि अश्लिल वेब सिरीजना वाढता प्रक्षकवर्ग हे सगळं कशाचं द्योतक आहे?

आपल्याकडेही 'ही' बातमी चालायलाच हवी या अट्टाहासापायी व्यभिचार, खून, बलात्कार, मोमो, कीकी, ब्लु व्हेल चॅलेंजच्या बातम्या दाखवून आपण नकळत त्यांचा प्रचार आणि प्रसार तर करत नाहीत ना ?
कारण बातम्यांमधूनच अशा गेम्स आणि घटनांबाबतची प्रेक्षकांची उत्सूकता चाळवली जाते आणि दर्शक त्याकडे आकृष्ट होतात.

ज्या तारे-तारकांना करिअरच्या अत्त्युच्च 'पीक'ला असतांना मराठीचा विसर पडलेला असतो तीच मंडळी त्यांच्या पडत्या काळात मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरत, त्यात पहीला-वहीला अभिनय करताना मराठीचा अभिमान, कळवळा असल्याचा आव आणतात. मराठीचं 'माधुर्य' अधोरेखित करत मराठीच्या वैशिष्टयांची 'लीस्ट' पुढे करतात.
('धक धक गर्ल'चा 'बकेट लिस्ट') हे सगळं बातमी म्हणून चालवतांना आणि बघताना अपण त्यांचा स्वार्थी हेतू नजरेआड करत त्यांना डोक्यावर तर घेत नाही ना ? असा प्रश्न पडतो.

फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडणारे नट, वन्य जीवांची शिकार करणाऱ्या नट-नट्या, भ्रष्ट राजकारणी, अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले तरीही निवडणूक जिंकणारे नेते, केवळ नावात 'राम' आणि रावणाची वृत्ती असलेले दादा, भाऊ, कार्यसम्राट वगैरे यांचं आपण आपल्या नकळत उदात्तीकरण तर नाही ना करत आहोत. कारण त्यांच्या सभांना, भाषणांना होणारी अलोट गर्दी पाहून हेच लक्षात येतं.

या सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये काही सकारात्मक विचार देणाऱ्या बातम्याही असतात ज्यांमुळे थोडा दिलासा मिळतो. महाराष्ट्रातील अकोलेमधील ग्रामिण भागात राहून बियाण्यांची बँक जपणारी राहिबाई सोमा पोपेरे, रेल्वे स्टेशनवर आपला जीव धोक्यात घालून ईतर प्रवाशांचे प्राण वाचणारे आरपीएफ जवान, आपली सोन्याची अंगठी विकून शाळा उभी करणारे बीडचे मुख्याध्यापक, मरणोत्तर अवयवदान करून दुसऱ्याला जीवदान देणारे आसामी. अशा आदर्श बातम्यांमुळे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी चांगलही देतो आहोत हे समाधान त्यातून मिळतं.

असो...शेवटी 'ब्युरो रिपोर्ट' म्हणत निरोप घेण्याआधी एक सांगतो. खरं तर वृत्तवाहिनी, रेडिओ, वृत्तपत्र या माध्यमांची हीच खासियत आहे की अपल्याला एकाचवेळी अनेकांशी संवाद साधता येतो. कधी आहे तसं तर कधी मनीचं गूज सांगता येतं आणि काही अंशी का होईना...जनप्रबोधन करण्याची संधी मिळते.

- नितीन माधव, पत्रकार, मुंबई


पत्ता - पॅराडाईस हाइट सोसायटी, चिकूवाडी, बोरिवली (पश्चिम), मुंबई

अल्पपरिचय - सुरुवातीला दैनिक लोकसत्ता मधून 'अभयारण्ये' मालिका लेखन. पुढे
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर अँकर तर टीव्ही 9 मराठी मध्ये बुलेटीन प्रोड्यूसर जबाबदारी.
शिवाय आकाशवाणी मुंबईच्या 107.1Mhz 'एफएम रेनबो' रेडिओ वाहिनीवर रेडियो जॉकी.

भावगीते, कवी कट्टा, राजकीय सभा अशा मंचीय कार्यक्रमांच सूत्रसंचालन.
कविता लेखन आणि कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्या कवितांच साभिनय सादरीकरण.

मंगलवार, 12 मई 2020

विश्वाचे मूळ : सौ. सुरेखा बोऱ्हाडे,नाशिक







विश्वाचे मूळ

       गप्पा सुरु झाल्या की मग हळूहळू त्या प्रवाहात बोलण्याच्या विषयाला धरुन किंवा मग त्या विषयाच्या  अनुषंगाने , दुस-या अनेक मनातल्या गोष्टी प्रवाहीत होतात.कौटुंबिक गप्पात त्यातही बहिणी आणि मैत्रिणीमध्ये तर मी कायम हसत म्हणत असते ,"मी जन्मापासून वीस वर्षे आईला आणि लग्नानंतर नव-याला सोडून एक दिवसही कुठे राहिले नाही. अगदी दिवाळीला एक दिवस माहेरासाठी असतो."गप्पा म्हणून सहज जरी बोलले तरी खरंच आई आणि नवरा या दोघांचे माझ्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे. ही दोघं माझे गुरु,मार्गदर्शक आहेत.सुख - दु:खात ह्या भक्कम व्रुक्षाच्या आधारानेच मी तगून आहे. अर्थात हे दोन पदर प्रत्येकाच्याच जीवनात महत्त्वाचे असतात.आई जन्म देते  ,लालन -पालन करते तर जोडीदार जीवन भर साथ देतो.
         आईने जन्म दिला .या जगातला प्रकाश दाखवला.देव कुणी पाहिला आहे?पण आईचआपला परमेश्वर!बाळ जन्माच्या वेळच्या तिच्या कष्टदायक परंतु तरीही सुखावह प्रसुती वेदनातून तिचा नवा जन्म आई या रुपात होतो. ह्या तिच्या कष्टदायी वेदना,त्यानंतरचे बाळाचे कठोर संगोपनाचे कार्य आपल्याला आठवत नाही. परंतु आई झाल्यावर माझ्या आईच्या वेदना , कष्ट मला कळाले. पण खरं प्रामाणिकपणे सांगयचं तर मी आई झाल्यानंतर मी माझ्या आईपणातच गुंतून गेले. स्वतः च्या आईला आपण किती जाणून घेतो?माझ्या जन्मानंतर आई खूप आजारी होऊन चार महिने तिचा दवाखाना चालू होता ,त्यामुळे मला तिचे अंगावरचे दूध मिळाले नाहीअसे  मोठे झाल्यावर कळाले. मोठं एकत्र कुटुंब होते. काकूला बाळ होते. तिनेच  मलाही दूध पाजले.दोन आईचे दूध पिले म्हणून मी सर्व भावंडांत प्रेमळ आहे असे घरात सर्व म्हणतात.
          वडिल शिक्षक असल्याने कुटुंबातील आम्ही दहा-बारा भावंडे  नोकरीच्या गावी शिक्षणासाठी एकत्र होतो.माझ्या आईने आम्हा सर्व भावंडांचे संगोपन एका मायेच्या नजरेतून केले.कोण सख्खा आणि कोण चुलत भावंडं आहे हे कधीही लक्षात येऊ दिले नाही. आम्हा बहिणींना कामाची सवय लागावी म्हणून छोटी छोटी कामे ती आम्हाला वाटून देई.पण काम केलेच पाहिजे असा कडक दंडक तिचा कधी नसायचा.या तिच्या प्रेमळपणाचा मीच अधिक फायदा घेतला असे आता वाटते.मी कायमच अंगणात मैत्रिणींबरोबर खेळणण्यात मग्न असायची. एवढ्या कुटुंबाचा गाडा ओढायचा तर आई  कायम कामात व्यस्त असायची. तिला रिकामे बसलेले किंवा शेजारणीशी शांत बसून गप्पा मारतांना मी कधी पाहिले नाही. दिवाळीच्या सणाला दिवसभर काम करुन रात्री बारा बारा पर्यंत फराळाचे बनवायची. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा ओढतांना एवढी ढोरमेहनत तिला करायला लागत होती पण कधी  याबद्दल तिचा तक्रारीचा स्वर ऐकला आला की चेहऱ्यावर नाराजीचे भाव .तिच्या हातच्या स्वयंपाकाला अम्रुताची चव आहे. जेवणात मला थोडे जरी तिखट लागले तरी तिचा जीव कासावीस होतो. दुधपोळी,गुळपोळी क्षणात पुढे हजर होई.
            लहानपणाचा म्हणजे मी दहा वर्षाची असेल तेव्हाचा एक प्रसंग आजही लख्ख आठवतो.
हिवाळ्यात कडक थंडी असे. रात्री मुलांच्या झोपण्याची सर्व व्यवस्था करुन दिल्यावर भल्या मोठ्या भांड्याचा ढिग ती घासायला घेई.आम्ही सख्या चुलत एकूण सहा बहिणी असतांना पोरींना भांडी घासता धुता थंड पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून ती मदतीला घेत नसे.पण ती एकटी भांडी घासणार म्हणून मी हट्टाने मदतीला जायची. तेव्हा ती म्हणायची "अगं,मुलींना सासरी काम करायचीच आहे. आता आराम करा."
पण मी काही ऐकायची नाही ,भांडी धुणार म्हणजे धुणार. थंड पाण्याने माझे हात काकडू नये म्हणून गरम पाणी ती करून देई आणि मग मी भांडी धुवत असे. त्यावेळी ती कौतुकाने म्हणे, "फक्त माझ्या माईला माझी कीव आली."मला घरात सर्व माई म्हणतात.माझ्या चेह-यावर तिला मदत केल्याचे समाधान पसरे.पण गरम पाणी करुन तिचे काम मी वाढवायचे हे आता लक्षात येते. सख्याबरोबर खेळणे,हुंदडणे आणि इतर वेळात वाचन करणे यामुळे मी घरकामात तशी  कमीच मदत करत असे.एवढे मात्र खरे तिने कधी काही काम सांगितले आणि मी केले नाही असे आजपर्यंत कधी झाले नाही. दुकानातून काही आणायचे असेल तर इतर भावंडे तिच्या मिणतवारीला ऐकत नसे मी तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडताच तिचे काम करत असे.माहेरचे माडीचे मोठे घर आहे.मोठ्या बैठकीला झाडू मारणे आणि आवरणे मोठे काम. ते काम मी अगदी छान करत असे. त्याचेही ती आजही विषय निघाल्यावर खूप कौतुक करते.आपल्या  छोट्या कामाचे भरभरून कौतुक करणारी,आपल्या चुका पोटात घालणारी आईच असते. आईला सोडून मी सुट्टीत कितीही मोठे अमीश मिळाले तरी मामाच्या गावाला जायचे नाही.आईच्या आसपासच्या वावराने मला कायमच सुरक्षित वाटायचे. शाळेतून आल्यावर आई दिसली की पोट भरत असे.मग खेळायला मोकळे वाटे.संध्याकाळी ती देवाला दिवा लावायची तेव्हा निरांजनाच्या प्रकाशात ती देव्हाऱ्यातल्या लक्ष्मीपेक्षा मला सुंदर, मंगल भासे.सात्त्विकता, सुंदरता ,मंजूळ बोलणे तिच्यात ओतप्रोत भरलेले आहे. तिने मुलांना रागवल्याचा चढा आवाज आजपर्यंत ऐकवात नाही. आमच्या मुलांना आम्ही रागवतो तेव्हा ती सांगते ,"प्रेमाने बोलले म्हणजे मुलं ऐकतात ."न बोलताही कितीतरी गोष्टी तिने क्रुतीतून शिकवल्या. आताही  खरं तर,जेव्हा तिची सेवा करायची मी  परंतु मलाच कुठल्याही प्रसंगी गरज लागली तर ती तत्पर असते.
 याबदल्यात तिला काहीही नको असते. तिला हवे असते आपल्या लेकराचे सख .मुलं सुखी आहे तर ती सुखी आहे.हे आज मीही आई आहे म्हणून कळतेय.जीवनात आई आजपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेमाने हात पसरुन मला सहाय्य करायला, आधार द्यायला, प्रेमाची उबदार सावली द्यायला कायम तयार असते.त्यामुळे आजही मला सुरक्षित, संपन्न वाटते.ह्या सावलीचा अखंड सुखानुभव घेत जीवन जगण्यातच सा-या विश्वाचे मूळ आहे हे नक्की!
                         -
 - सौ.सुरेखा अशोक बो-हाडे,
  नासिक,मोबा.9158774244


रविवार, 10 मई 2020

कोण होती निऋती ???? डॉ. अशोक राणा

डॉ. अशोक राणा यांच्या पुस्तकातील निवडक प्रकरणे

 












- प्रा.डॉ. अशोक राणा, यवतमाळ



शनिवार, 9 मई 2020

बदलत्या गावाचा वेध घेणारी गझल : शंकर घोरसे, नागपूर




गाव

गावात गाव माझे आता मला दिसेना
माझेच गाव आहे विश्वास हा बसेना

आपापल्या जगी हे सारेच कैद झाले
कोणी कुशल कुणाचे कोणासही पुसेना

हाकीत लोक होते जेथून गावगाडा
पारावरी सुन्या त्या कोणी कसे जमेना

जातीत वाटलेला नव्हता समाज तेंव्हा
जातीनिहाय आता झाल्यात येथ सेना

शोधावयास चारा पिल्ले उडून गेली
घरटे उदास झाले त्याला कुणी बघेना

कोणाकडेच कोणी का येत जात नाही ?
नात्यातला जिव्हाळा गेला कुठे कळेना

सारेच पोक्त झाले नाही उनाड कोणी
कोणी कसे हसेना? कोणी कसे रुसेना ?

कोणीच ओळखीचे येथे मला दिसेना ?
कोणास हाक मारू काही मला सुचेना ?

@ प्रा. जयसिंग गाडेकर,आळे
ता- जुन्नर, जि- पुणे

 मा. प्रा. जयसिंग गाडेकर हे साहित्याचे गाढे अभ्यासक असून उत्तम समीक्षक आहेत. त्यांच्या गझलेवर माझ्या सारख्या नवोदिताने काही लिहिणे म्हणजे काजव्याने सुर्याला प्रकाश देण्याचाच प्रकार ठरेल म्हणून मला त्यांची समजलेली कवीता व त्याचे हे रसग्रहण माझ्या अल्पशा आकलन शक्तीनुसार  आपल्या सर्वांच्या पुढ्यात ठेवण्याचा  हा प्रयत्न आहे.
"गाव आता गावात राहिलं नाही. धड खेडंही म्हणता येत नाही किंवा त्याला शहाराचं लेबलही लावता येत नाही" या माझ्या "बा स्वातंत्र्या !" या कवीता संग्रहातील "विकास आणि प्रगती" या कवीतेतील ओळीप्रमाणेच ..अश्याच काहीश्या  द्विधा परिस्थितीत हे गाव येऊन ठेपलं आहे. हे माझं स्वतःचं बालपणी मी बघितलेलं गाव आहे किंवा नाही यावर आता विश्वासच बसत नाही एवढं गाव आता बदलेलं आहे. तथाकथित विकासाच्या शर्यतीत त्यानेही आता कात टाकली आहे.
बदलत्या काळानुसार भौतिक सुखात सारेच रममाण होऊन आपापल्या वेगळ्याच दुनियेत प्रत्येकाने स्वतःला कैद करुन घेतले आहे. ते त्यांच्या भावविश्वात तल्लीन आसतांना नातीगोती पार विसरुन गेलेत परस्परांशी असलेला जिव्हाळा आटवून स्वार्थाची तेव्हढी बासुंदी चाखतांना कुणाला कुणाचेही कुशल मंगल जाणून घ्याला अजिबात वेळही शिल्लक नाहित आणि जाणून घ्यायची इच्छाशक्ती तर मुळीच उरलेली दिसत नाही.
पुर्वी ज्या पारावर गप्पागोष्टीचे फड रंगायचे व जेथून गावाचा पुरा गावगाडा चालत असे तो गावातील पार आता कालबाह्य होऊन सुना पडलेला दिसतोय .आत्या त्या पाराकडे कुणी ढुंकूनही पाहत नाहीत .
आधी गावात कमालीचा एकोपा असायचा, जातीपातीचा तेव्हा लवलेश सुध्दा कुणाच्याही मनाला शिवत नसे. परंतू कालांतराने आता मात्र आम्ही स्वतःला तथाकथित साक्षरतेचं लेबल लावून गावावातून जाती-पातीच्या तेवढ्या संघटना उभ्या केल्या आहेत.आणि गावातील तत्कालीन एकोपा मोडीत काढून त्याला मात्र आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितपणे भावपुर्ण श्रध्दांजली वाहिलेली आहे.
गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या  शोधात येथल्या नवीन पिढीने मोठ्या शहराकडे धाव घेऊन देशविदेशात जाऊन स्थिरावले आहेत. आणि आपल्याच गावातील आपल्या वडिलोपार्जीत राहत्या घराशी नाळ तोडली आहे. त्याकडे बघायला सुध्दा कुणाकडेच आता वेळ नसल्याने ते घय मात्र उदास झाले आहे,
गावातील जुनी संस्कृती लोप पावलेली असून सगळीकडे घरोदारी शहरी संस्कृतीने अतिक्रमण करीत असतांना दारबंद संस्कृती रुजत असल्यामुळे हल्ली सहसा कुणीच कुणाकडे जात नाहीत. सगळ्यांनी जणू एकलकोंडेपणाच जोपासलेला दिसतोय नात्यातला जिव्हाळा सुध्दा या तथाकथित विकासाच्या दृतगती महामार्गात केव्हा गाडप झाला काही कळलेच नाही. आमच्या अतिरेकी दैनंदिन वागणूकीमुळेच दिवसागणिक वाढत चाललेल्या वैश्विक तापमानात आमच्या नात्यातील ओलावा सुध्दा कृत्रिम बाष्पीभवनाने उडून गेला की काय हे कळायला मार्ग नाही ,
इथे आता सारेच पोक्त झाले आहेत .उनाड म्हणून कुणीच शिल्लक राहिलेलं दिसून येत नाही.
या धकाधकिच्या तथा स्पर्धेच्या युगात शर्यत जिंकण्याच्या नादात शर्यतीतल्या घोड्यांप्रमाणे धावतांना आता आमच्या चेहऱ्यावर कधी हसू येतच नाही किंवा रुसाण्याचा आमचा गुणधर्म सुध्दा आम्ही पार विसरुन गेलो आहोत.
मी माझ्याच वेगळ्याच नादात वर्तमानातील या कार्पोरेट दुनीयेत अगदी व्यवहारिक जीवन जगत आसतांना येथे मला आता कुणीच माझ्या ओळखीचे  दिसून येत नाही. स्वार्थी जीवन जगतांना मी कुणाशी फारसे संबंध ठेवालेच नाहीत म्हणून अगदी माझ्या अडीअडचीच्या वेळेस तरी किमान कुणाला हक्काने हाक मारु मला काहिच कळत नाही.
प्रा.जयसिंग गाडेकर सर यांची वरवर साधी दिसणारी गाव हि गझल खूप आशयधन आहे. प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी हि गझाल आहे.  या गझलेतील प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कवीताच आहे. त्यांच्या पुढील साहित्य लिखणास माझ्या भरभरून मनःपूर्वक शुभेच्छा आहेतच.

- शंकर घोरसे, खापरखेडा,जि. नागपूर,+91 94236 02435
(मृदगंध व्हाटसअप समुहातर्फे आयोजित एक दिवस , एक कवी, एक कवीता व त्यावर चर्चा ,भाष्य, रसग्रहण,परीक्षण इत्यादी उपक्रमातील  अतिथी कवी प्रा. जयसिंग गाडेकर , आळे. ता.जुन्नर ,जिल्हा- पुणे यांच्या गाव या गझलेचे मी केलेले रसग्रहण.. )
प्रा. जयसिंग गाडेकर परिचय

शिक्षण- M.Sc. (Organic Chemistry) B.Ed.SET.

# *व्यवसाय- Head,* *Department of Chemistry,*
*Hon. Balasaheb Jadhav* *Arts,Commerce and* *Science College, Ale*

#. *सासवड, पिंपरी चिंचवड, डोंबिवली, बडोदे, यवतमाळ आणि उस्मानाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात कवीकट्टा या काव्यमंचावर सलग सहा वर्षे कविता सादर केली आहे.*

# *प्रकाशित साहित्य-*
*भोपाळ(म.प्र.) विश्वकोश शृंखला शब्दकोश या १५ भाग असलेल्या विश्वकोशाचे मुख्य संपादक म्हणुन काम केले.*
*(ई.स.२००८)*

*रसायनशास्त्र शब्दकोश या मराठी भाषेतील पहिला इंग्रजी मराठी शब्दकोशाचे लेखन व प्रकाशन. .(ई.स.२००८)*

# *"आयुष्य चालताना" हा कवितासंग्रह प्रकाशित*
*(इ.स.२०१३)*

शुक्रवार, 8 मई 2020

युद्धशाळा . डॉ. राजेंद्र मुंढे ,वर्धा





.




: परिचय :

 ० नाव : राजेंद्र दुर्योधन मुंढे
 ० जन्मदिनांक : १० डिसेंबर १९६२
  ० शैक्षणिक पात्रता : एम. ए. मराठी प्रथम श्रेणी १९९१ , बी. एड , सेट (मराठी ), पीएच. डी.
  ० पत्ता : आर्वी नाक्यामागे , ज्ञानेश्वर नगर , वार्ड ९ , वर्धा . ४४२००१. मो ९४२२१००४९
  ० ईमेल : rajendramundhe 004 @gmail.com
   ० विविध प्रकारचे लेखन : ० स्फुट लेखन ५००  , समीक्षा ५० शोधनिबंध /लेख १० , कविता ९०
                                      ० प्रसंगोपात्त वैचारिक लेखन .
 ० साहित्य प्रकाशन : ० दैनिके : महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता , नवशक्ती ,  सकाळ , तरुण भारत , लोकमत . प्रहार
                              .          नागपूर पत्रिका , सामना . केसरी , प्रभात , गावकरी , तरुणभारत पुणे , मुंबई , औरंगाबाद ,                                        सोलापूर  बेळगाव . गोवा , पुण्यनगरी , देशोन्नती इत्यादी
                    ० साप्ताहिके :   लोकप्रभा . चित्रलेखा , स्वराज्य , गावकरी , रविवार दिनांक , श्री , ब्लीट्स, महाराष्ट्र
                    ० नियतकालिके :                 किर्लोस्कर , हेमांगी , साधना , अनुष्टुभ , युगवाणी , अस्मितादर्श ,   अक्षरवैदर्भी , समुचित , समाज प्रबोधन पत्रिका , अक्षरपेरणी , रुची , ब्र , प्रतिष्ठान , ललित , अक्षरगाथा , आदी .
० प्रकाशित पुस्तके  :० राष्ट्रसंत तुकडोजी , लोकवाङमय गृह , मुंबई १९९७
                             ० राष्ट्रसंतांचे मौलिक विचार , ----" ---------    २००२
 ० संपादने पुस्तक :   ० बंडखोर खेड्यांची गोष्ट (संपादन : १९४२ चा आष्टीचा लढा )२००७
० डॉ. किशोर सानप व्यक्ती आणि वाडमय ( सहित्यासुची)२०१७
 ० कार्यकारी संपादक :  ०आत्मभान ,त्रैमासिक औरंगाबाद  २००७ पासून ......
 ०  मुख्य संपादक :      ०.वरदा.. वर्धा (शतकोत्तर  सुवर्ण जयंती वर्धा निमित्त )
 ० संस्थापक संपादक : ० " इत्यर्थ " वाड्मयीन त्रैमासिक (१९९८ ते १९९९ तीन अंक)
 ० दिवाळी अंक संपादन : ० " पाऊलवाट " १९९४ संयुक्तपणे डॉ. सतीश पावडे
  ० स्मराणिका संपादन :० वर्धा जिल्हा साहित्य संमेलन १९८८(कार्यकारी संपादक )
                              ० ८वे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन २००५ (मुख्य सं )
                               ० राज्य स्तरीयस्काऊट गाईड मेळावा २००८ ( संपादक )
० अतिथी संपादन :        ०" अक्षरपेरणी " वाड्मयीन त्रैमासिकाचं डॉ. किशोर सानप समीक्षा विशेषांक सप्टें २०१७
० पुरस्कार :राष्ट्रसंत तुकडोजी पुस्तकाला १९९७-९८ चा उत्कष्ठ वाड्मय निर्मिती     पुरस्कार   
               * अरविंद देशमुख पत्रकारिता पुरस्कार २००२
               *यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट लेखन पुरस्कार २००४
               *मा. बा. गांधी ट्रस्ट नागपूरचा  शिक्षक पुरस्कार २००७
                * राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पत्रकारिता पुरस्कार २०१७-१८
                 * विद्याज्ञान वृती पुरस्कार २०१८ ( पीएचडी बद्दल )