बुधवार, 25 मार्च 2020

सांगलीचे वसंत केशव पाटील उर्फ वके सर हे हिंदी अनुवादक आणि ज्येष्ठ कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. मित्रवर्य अभिजीत पाटील यांच्या ' अबीर गुलाल ' या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहभाग नोंदवताना  वकेंची ओळख झाली. त्या आधी त्यांना वाचून होतोच. नुकतेच ते ७५ त पदार्पण करत आहे त्याचे औचित्य साधून आभिजीतची प्रतिक्रिया आणि सरांच्या परिचय देत आहे...
 - संपादक

 वकेंच्या ७५ च्या निमित्ताने त्याच्या वरील लेख अनेकांनी  लिहिले बहुतांशी लेखात वकेंच्या साहित्या बद्दल त्याच्या अनुवादा बद्दल वकेंचे कौतुक केले आहे ,
परंतु त्याच्या वागण्या बोलण्यातून कधीकधी कृतीतून चर्चेतून त्याच्या बद्दलच्या समज गैरसमजाची चर्चा कमीजास्त प्रमाणात अधिक झाली विक्षिप्त पणा हा गुण मोठ्या लेखकांना शोभून दिसतो, ते तसे का याचा शोध घेतांना त्यांनी तसेच रहावे तरच ते "ते" असतात त्याच्यातल्या त्याला बाजूला केलं तर काय उरते म्हणून लिहिली कविता *अवघड आहे*
अवघड आहे या माणसावर
कविता लिहिणे,
कथा म्हणाल तर
कुठून करणार सुरूवात ?
कादंबरीत बसेल म्हणता हा माणूस ? ...
अवघड आहे !
दिसतो तुम्हाला आम्हाला तसा आहे का ?
आहे तो नेमका तसा का ?
कठीण आहे शोधणे...

पण जाणून घेणे म्हणजे
पाण्यात पाय सोडून बसावे तासन् तास
त्याच्या बदलत्या
प्रवाहा सोबत त्याच्या लयीचा अंदाज घेत,

पण तळ सापडेल तर शपथ !
शोधू नका तळ,
तो मात्र एका खोल अंशावर घट्ट आहे स्वतःला धरून
एखादा लाव्हा उगमस्थाना सारखा...

म्हणून त्याची कहाणी होते पुढे
कोण जाणे पुढे
दंत्तकथाही होतील...
आपण मात्र एखाद्या बुलंद
राजवाड्याच्या दरवाजातून
ये - जा करत या माणसांचा स्नेह जपायचा,
आणि त्या भव्य प्रवेशव्दारा वर आपली अक्षरे लिहायची
काही राहतील काही पुसून जातील,
कारण वसंत केशव पाटील
हीच अक्षरं इतकी मोठी आहेत की
आपली अक्षरं फक्त आपल्यालाच दिसतील ,
तुम्हाला काय वाटतं ?...

- अभिजीत पाटील सांगली

वके सरांचा परिचय

वसंत केशव पाटील,जन्मदिनांक : २० मार्च १९४६ 
२८ वर्षे सेवा... निवृत्त प्राध्यापक. सध्या निवास : सांगली मोबा. ९७६७७५१२३०. 
     *प्रकाशित पुस्तके*
📙 दशद्वार ते सोपान 📙 कंदीलाचा उजेड 
📙 दिपराग📙अखेरचे झोपडे 📙 त्याने जंगल जिंकले
📙 छप्पर 📙 कर्मवीर भाऊराव पाटील 
📙यशवंतराव : विचार आणि वारसा 
📚... यासह अनुवादीत नि स्वत:ची एकुण २० पुस्तके प्रसिद्ध. अनेक पुस्तकांच्या दोन-तीन आवृत्ती प्रकाशित... 

    *पुरस्कार व सन्मान*
🏆साहित्य अकादमी पुरस्कार अनुवादासाठी १९९६
🏆महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०००
🏆वसंतदादा पाटील साहित्यरत्न पुरस्कार १९९०
🏆तांबटकाका साहित्य गौरव पुरस्कार २०००
🏆कऱ्हाड गौरव पुरस्कार १९९७
🏆जेमिनी अकादमी पानीपत(पंजाब)डाॅ. दुबे पुरस्कार २००१
🏆सहस्राब्दी विश्व हिंदी सेवा पुरस्कार २००१
🏆एशियन - अमेरिकन 'हूज हू' मध्ये समावेश २००१
.... यांसह अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय मानसन्मान, पुरस्कार,साहित्य संमेलनाध्यक्ष पदे...


'वसंत केशव पाटील' यांनी कथा, कविता, गझल, ललित व समीक्षा या साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले आहे. याशिवाय हिंदी, उर्दू, तेलगू व पंजाबी भाषेतील साहित्यकृतींचा मराठीत अनुवाद केला आहे. लेखन कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१५ मध्ये सांगलीत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला होता. तेलगू मधील केशव रेड्डी, पंजाबीतील गुरुदयाळ सिंह, हिंदीतील हरिवंशराय बच्चन यांच्या सह अनेक लेखकांच्या साहित्य कृतींचे मराठी अनुवाद केले आहेत. जवळजवळ २० पुस्तके व.के. सरांच्या नावावर आहेत. त्यापैकी 'अखेरचे झोपडे' ही अनुवादित कादंबरी व 'छप्पर' हा कथासंग्रह विशेष गाजला.


58 टिप्‍पणियां:

  1. अभिजीत खूप छान लिहिलय.धन्यवाद

    जवाब देंहटाएं
  2. व्वाह सुंदर!
    कविता खुप आवडली!

    जवाब देंहटाएं
  3. वसंत केशव पाटील यांच्या लेखनात अस्सल 24 कॅरेट सोन्या सारखी शुद्धता व वाड्.मयीन चमक आहे, साहित्यिक आणि माणूस म्हणून त्यांचे विस्ताराने, स्वतंत्रपणे मांडणी करता येण्याची ही वेळ आहे

    जवाब देंहटाएं
  4. बहरलेले जणू सरस्वतीचे झाडच..

    जवाब देंहटाएं
  5. आपल्या सुंदर कवितेतूनवसंत केशव पाटील सरांची भेट झाली. धन्यवाद ! 

    जवाब देंहटाएं
  6. फारच सुंदर आणि ताकदीची कविता लिहिलीत आपण. खरेतर या कवितेवर माझा हक्क असायला हवा होता. कारण वके सरांना मी गेली पंचवीस ,सव्वीस वर्ष ओळखतोय. तरीही हा माणूस मला शब्दात पकडता आला नाही. परंतू आपण त्यांना अत्यंत नेमक्या शब्दात पकडलं आहे याचा मला हेवा वाटतो. मन:पूर्वक अभिनंदन 💐💐💐💐💐


    तुमचे टायपिंग सुरू असतानाच पाटील सरांचा फोन आला. त्यांनी सांगितले हा ब्लॉग संजय बोरूडेने केला आहे. संजय माझा गेल्या तीस वर्षापासूनचा मित्र आहे. असो , जे माझ्याकडून व्हायला हवे होते ते माझ्या मित्रांच्या माध्यमातून होतोय याचाही आनंद आहेच. ग्रेट 👌👍💐

    जवाब देंहटाएं
  7. खूपच सुंदर लिहीलं आहे. सहज, सोप्या शब्दांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत .शुभेच्छा सह ....

    जवाब देंहटाएं
  8. उत्तर
    1. हार्दिक आभार,नवी पोस्त पहिली का?तुमचा उल्लेख आहे

      हटाएं
  9. इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.

    जवाब देंहटाएं
  10. थोडक्यात महत्त्वाचे...कविता सुंदर

    जवाब देंहटाएं
  11. या परिचय आणि सुंदर नेमक्या शब्दामुळे आम्हाला ही पाटील सरांचा परिचय झाला

    जवाब देंहटाएं
  12. तुम्ही केलेल्या वर्णनातूनच त्यांचं जीवन चरित्र डोळ्यासमोर उभे राहिले

    जवाब देंहटाएं
  13. आदरणीय भाईंचे अभिष्टचिंतन. उत्तम परिचय.

    जवाब देंहटाएं