रविवार, 19 अप्रैल 2020

कोरोनाचा विळखा : नितीन माधव







(नितीन माधव हे एक मुक्त आणि अभ्यासू पत्रकार आहेत,इलेक्ट्रोनिक तसेच प्रिंट  मीडियाचा त्यांना अनुभव आहे.त्यांनी हा आजचा ब्लॉग लिहिलाहे.मात्र या लेखात त्यांनी व्यक्त केलेल्या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.- संपादक,साहित्याक्षर.)


कोरोनाचा विळखा.. पत्रकाराच्या नजरेतून

सध्या आपल्या भोवती जे काही घडतयते ना काल्पनिक आहे ना योगायोग.
डिसेंबरच्या 31 तारखेला चीनसह जगभरात नव्या वर्षाचा जल्लोष साजरा केला गेला.
सर्वच न्यूज चॅनल्सच्या स्क्रिन्स आणि वृत्तपत्रांचे मुखपृष्ठ नवंवर्षाच्या मनोहारी दृष्यांनी
व्यापलेले होते...ते थेट आज सतत 24 तास आणि सातही दिवस कोरोनाच्या भयावह बातम्यांनी
धडकी भरवणारे टीव्ही स्क्रिन्स आणि वृत्तपत्रांचे मुखपृष्ठ.

सध्याच्या या परिस्थितीत पृथ्वी फिरायची थांबलीयेवैविध्यपूर्ण बातम्यांनी व्यापलेले टीव्ही
स्क्रिन्स अचानक कोरोनाच्या बातम्यांवर फ्रिझ झालेत की काय..असा भास झाल्याशिवाय राहत
नाही. आज सगळ्याच माध्यमातून जनतेला सांगितलं जातयसतत आवाहन केलं जातय की
घराबाहेर पडू नकाघरातच थांबा. मात्र तरीही नागरीक न जुमानता इतरत्र भटकतांना,
गर्दी करताना दिसताहेत. खरं तर ज्या जनतेला संडास कुठे करावी हे टीव्ही
जाहिरातींमधून सांगावं लागतंत्यांच्याकडून लॉकडाऊनदरम्यान घराबाहेर न पडण्याची
भाबडी अपेक्षा करणंच व्यर्थ.

कोरोनासमान संकट ओढवल्याची ही पहिली घटना असली तरी काही दशकांपूर्वी आलेली
प्लेगची साथ आणि दुष्काळ अशा भयानक संकटांचा सामना जगासह भारतीयांनीही मोठ्या
धिराने केलाय. तेव्हा तर आता आहेत तशी प्रसार माध्यमेसोशल मिडिया नव्हता.
जनजागृतीसाठी केवळ वृत्तपत्रेदुरदर्शन आणि रेडिओ हीच
माध्यमे होती. त्यामुळे केवळ विश्वासार्ह माहितीच जनतेपर्यंत पोहचायची. बाकी..मौखिक
अफवांचं पेव
तेव्हाही फुटायचं मात्र
त्याची गती आताच्या सोशल मिडियाइतकी तुफान नव्हती. तरीही साऱ्यांनी मिळून अशा
विश्वव्यापी संकटांवर यशस्वी मात केली होती. अगदी त्याच प्रमाणे कोरोनावरही आपण मात
करू मात्र भविष्यातील आपली जीवनशैली
आतासारखी नसेल कदाचित. कोरोनापासून बचावात्मक सुरक्षाकवच म्हणून आपल्या जगण्यात
अनेक बदल झालेले असतील. भेटल्यावर एकमेकांना आलिंगण देणेमायेने चेहऱ्यावरून हात फिरवणे,
हस्तांदोलन करणे या सगळ्या पद्धती ईतिहासजमा झालेल्या असतील. त्याऐवजी भेटल्यावर केवळ
लांबून नमस्कार करणे हीच सोशल डिस्टेन्सिंगची पद्धत पाळावी लागेल. स्पर्शातून केवळ प्रेमाचा
प्रसार
होतो ही भावना भयावह वाटू लागेल.
ऑफिसच्या कामामुळे घरच्यांसाठी वेळच मिळत नाही म्हणणारे आता घरच्या गोंगाटामुळे कामासाठी
एकाग्रता मिळत नाही अशा तक्रारी करू लागतील कदाचित..

शहरी भागात सकाळी उठल्यापासून ते नीज येईपर्यंत पक्षांचा
किलबिलाट      ही खरी तर अपूर्वाई.मात्र हा आनंद लुटतांना प्रत्येकाच्या मनाला एक धाकधूक
लागलेली
आहेच. खिडकीतून डोकावत
बाहेर प्रदुषणविरहीत निळंशार आभाळ बघतांना मनातल्यामनात एका अनाहुत भितीचे काळे
ढग दाटून आल्याशिवाय राहत नाही. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की काही काळानंतर एकदा का
सारं काही पूर्ववत झालं की किलबिलाट आणि निळ्या आभाळाचा आनंद विरून जाईल
आणि सर्वांना
तेच हव आहे.

प्रशासनडॉक्टरपोलीस जिवाची पर्वा न करता जनतेसाठी झटत आहेत. प्रत्येकाचा दृढ विश्वास
आहे की..
.शक्य तितक्या लवकर ही परिस्थिती बदलेल आणि कोरोनासारख्या अजात शत्रूशी सुरू असलेलं
युद्ध आपण जिंकलेलं असेल.

धन्यवाद !

*****
नितीन माधवमुक्त पत्रकारबोरिवलीमुंबई

9869782706



परिचय : नितीन माधव,
चिकूवाडीबोरिवली (पश्चिम)मुंबई

सुरुवातीला दैनिक लोकसत्ता मधून 'अभयारण्येमालिका लेखन. पुढे
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर अँकर तर टीव्ही 9 मराठी मध्ये बुलेटीन प्रोड्यूसर अशा जबाबदार्‍या.
शिवाय आकाशवाणी मुंबईच्या 107.1Mhz 'एफएम रेनबोरेडिओ वाहिनीवर रेडियो जॉकी म्हणून
जबाबदारी.

भावगीतेकवी कट्टाराजकीय सभा अशा मंचीय कार्यक्रमांच सूत्रसंचालन.
कविता लेखन आणि कुसुमाग्रजविंदा करंदीकर यांच्या कवितांच साभिनय सादरीकरण.

17 टिप्‍पणियां:

  1. स्वस्थ आणि मस्त व्यक्तीमत्व,प्रगतीच्या खूप आशा।

    जवाब देंहटाएं
  2. इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.

    जवाब देंहटाएं
  3. नितीन, अगदी थोडक्यात पण योग्य लिहिले आहे.

    जवाब देंहटाएं
  4. नितीन, छान, अतिशय सुंदर लिहिले आहे.तुझे लेख वाचण्यासारखे असतात.

    जवाब देंहटाएं
  5. विनय मौंदेकर

    नितीन, अतिशय सुंदर लिहिले आहे.तुझे लेख वाचण्यासारखे असतात.

    जवाब देंहटाएं
  6. चांगल लिहिलंय. एका सामान्य माणसाच्या मनात कोरोना बद्दल जे विचार येतायत ते मांडलेत.

    जवाब देंहटाएं
  7. krupaya,ithe kaheenchee naave disat aahet.tar kahee unknown disat aahet.krupaya naawe kalawane aani prtyek comment takanaarya vyaktine blog follow karawa hi vinantee.

    जवाब देंहटाएं
  8. Nitin hi corona paristiti far critical aahe pan kahi lokan mule ya paristithi tun baher nighayla tras hoto aahe prashasanala sahkarya karne aapli javabdari aahe jansamanya na jagrut karne khup kathin aahe ani he kam tumchya sarkhe patrkar Pramanik pane karat aahet yacha aamhala abhiman aahe ani tu he kam asech karat rahave hi ichha.........Swarupa Vaidya Deshpande

    जवाब देंहटाएं
  9. Nitin hi corona paristiti far critical aahe pan kahi lokan mule ya paristithi tun baher nighayla tras hoto aahe prashasanala sahkarya karne aapli javabdari aahe jansamanya na jagrut karne khup kathin aahe ani he kam tumchya sarkhe patrkar Pramanik pane karat aahet yacha aamhala abhiman aahe ani tu he kam asech karat rahave hi ichha.........Swarupa Vaidya Deshpande

    जवाब देंहटाएं
  10. नक्कीच युद्ध आपण जिंकलेलं असेल मात्र खूप मोठ्या किंमतीवर,लेख खूप छान लिहिलाय, आणखी नवे प्रश्न आहेत समाजा मध्ये त्यावर ही आपल्याकडून समीक्षण झाले तर आवडेल, आणि विश्वासार्ह माहिती आपल्याकडून मिळेल
    अभिनंदन

    जवाब देंहटाएं
  11. खूप चांगले लिहले सामान्य माणसांना नक्कीच दिलासा मिलेल very good शुभेच्छा

    जवाब देंहटाएं
  12. नितीन अगदी छान आणि सोप्या शब्दात माणसाला लागणार निर्सर्गाचं देणं काय त्या संदर्भात लिहण्याचा तुम्ही उत्तम प्रयत्न केला आहेत,सध्याच माणसाच जगणं म्हणा जगण्याच्या ,राहण्याच्या पद्धती बदलल्या आहेत,बाहेर रोड वर कचरा करणारे हि आपलीच मनास,ती हि गुडूप झाली, एकंदरीत काय ,सध्य परिस्थितून आपण बाहेर पडलो तरी स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत जे आपण आत्ता पाळतोय , कारण आपली लोकसंख्या जास्त आहे ….तुमच्या सारख्या अश्या विचारांची माणसा माणसात ती जनजागृती झाली पाहिजे ,तुम्ही अश्या चांगल्या स्व विचारांनी सुरवात केली तस आम्ही हि करू,इतरांनी पण करावी.कमी शब्दात समजेल उमजेल अशी सुंदर मांडणी तुम्ही केली आहेत.नक्कीच या परिस्थितून आपण जिंकून ,निसर्गाची परीक्षा पास होऊन बाहेर पडू हि प्रार्थना भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.घरात राहा तुम्हाला कस म्हणू ? काळजी घ्या.

    जवाब देंहटाएं
  13. अतिशय सुंदर आणी विधायक व आशादायी विचार आहेत नितिन, आपण सर्व निश्चित हे युध्द जिंकूच .

    जवाब देंहटाएं