रविवार, 12 जुलाई 2020

सु.शि.


रहस्यकथालेखक व १०० चे वर पुस्तके लिहिणारे कादंबरीकार ,#सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. यांचे आज पुण्यस्मरण (नोव्हेंबर १५, १९४८ - जुलै ११, २००३) 
१९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु 'लोकांना आवडेल ते' अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंघांच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथादेखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या 'देवकी' या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत.(विकिपीडिया )
त्यांची साहित्यसंपदा 
अंतिम------अतर्क्य-----अनुभव------अंमल-----असह्य-----असीम------असो ...------आक्रोश-----ऑपरेशन बुलेट------ऑब्जेक्शन युवर ऑनर-----ऑर्डर ऑर्डर-----आवारा------इज्जत-----इत्यादी... इत्यादी...-----इथून तिथून------इलेव्हन्थ अवर------एक ... फक्त एकच!------एव्हरीथिंग ... सो सिंपल!-----ओ गॉड------कणाकणाने-----कथा पौर्णिमा-----कपाकपाने------कल्पांत-----काटेरी-----कायद्याचे हात------क्षण क्षण आयुष्य-----किल क्रेझी----कोल्ड ब्लड-----कोवळीक------क्रमश:------गढूळ------गुणगुण------जाई-----जाणीव------जीवघेणा------झलक-----टेरिफिक-----ट्रेलर गर्ल------तलखी-----तलाश-----तुकडा----तुकडा चंद्र-----थँक यू मि. न्यूजपेपर------दास्तान------दुनियादारी------धुकं-धुकं------नॉट गिल्टी-----निदान------निमित्तमात्र------निराकार----न्याय अन्याय-----पडद्याआड-----पाळं मुळं-----प्राणांतिक------फलश्रुती------बंदिस्त-----मंत्रजागर-----मधुचंद्र-----मरणोत्तर------मर्मबंध----मातम----माध्यम-----मास्टर प्लॅन----माहौल-----मुक्ती----मुखवटा-----मूडस-----म्हणून-----बरसात चांदण्यांची-----बिनशर्त-----योगायोग-----रूपमती----लटकंती-----लास्ट बुलेट------वंडर ट्वेल्व्ह------वर्तुळातील माणसं------वास्तविक------वेशीपलिकडे-----शब्दवेध-----शेडस------सनसनाटी----सन्नाटा-----सफाई-----समांतर-----सराईत------संशय-----सायलेन्स प्लीज-----सॉरी सर------सालम-----सूत्रबद्ध-----सैतानघर------स्टुपिड------स्पेल बाउंड-----स्वीकृत-----हॅलो हॅलो-----हायवे मर्डर-----हिरवी नजर----हृदयस्पर्श------क्षितिज
"********************************************
( लेख फॉरवर्डेड ) 
सुहास शिरवळकरांच्या घरी त्यांना भेटण्याचा योग आला होता. मित्राच्या पुस्तकाच्या कामासाठी दिलीपराज प्रकाशनाकडे गेलो होतो. तिथे बोलता बोलता प्रकाशक म्हणाले, सु.शि. वरच राहतात. मग काय.. त्यांनी फोन लावून सु.शि. शी बोलून  घेतले. मग आम्ही अपार्टमेंटच्या पायऱ्या चढून गेलो. एक साधा टी शर्ट व जीन्सची पँट घातलेले शिरवळकर समोर आले. फ्लॅटच्या बाल्कनीत दोन तीन गोधड्या , चादरी . मराठी लेखकाचे घर शोभते खरे, असे वाटून गेले.  दोन तास चर्चा, दोनदा चहा झाला. सु.शि. नी सिगारेट शिलगावत गप्पांचा फड रंगवला. त्यांचे वडील प्रख्यात कीर्तनकार होते  आणि त्यांचे मूळ आडनाव देशपांडे असल्याचे त्यांनी सांगितले. नगरला दिल्ली गेटला त्यांचे बंधू उत्तम शिरवळकर राहात होते. त्यांच्या ' जाई ' या गाजलेल्या कादंबरीबद्दल, उठलेल्या वादळाबद्दल आणि त्यांना आलेल्या पत्राबद्दल खूप सविस्तर चर्चा झाली. त्या काळात मोबाईल नसल्याने हा क्षण पकडता आला नाही.

 लोकप्रिय साहित्यिकाला अखिल भारतीयवाले संमेलनला सहसा बोलावत नाहीत. पण सुशि त्याला अपवाद ठरले. नगरच्या संमेलनात त्यांना सन्मानाने बोलावले गेले, तेव्हाही त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांच्या प्रेमात असणारे आमचे भिंगारचे  लेखक मित्र सुनील राऊत यांनी त्यांना पुस्तक प्रकाशनासाठी बोलावले, तेव्हाही संवाद झाला. कालपरवा सुशि यांचा स्मृतिदिन होता, त्पानिमिताने हे स्मरण. धन्यवाद
- डॉ. संजय बोरुडे

1 टिप्पणी:

  1. छान प्रासंगिक लेख. सुहास शिरवळकर यांनी मराठी कादंबरीला समृद्ध करण्यात सनी तरुणांना कफम्बरी वाचनाकडे वळविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे..

    जवाब देंहटाएं