महाकवी सुधाकर गायधनी
जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या महाकवी सुधाकर गायधनी यांचा हा पहिला संग्रह आजपासून बरोबर ४६ वर्षापूर्वी प्रकाशित झाला .त्याची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून त्या निमित्ताने आजचा ब्लॉग लिहिला आहे,सुप्रसिद्ध कवी डॉ.बाळासाहेब लबडे यांनी.विशेष म्हणजे हा कविता संग्रह गायधनी यांना स्वत:लाच एम.ए.ला अभ्यासाला होता.मराठी साहित्यात हा पहिलाच योगायोग होता.सुधाकर गायधनी यांच्या 'महावाक्य' या ग्रंथामुळे डॉ.प्रल्हाद वडेर,निर्मलकुमार फडकुले,द.भि.कुलकर्णी,के.ज.पुरोहित,वि.स.जोग,सदानंद मोरे यांनी त्या ग्रंथाला 'महाकाव्य'एकमुखाने मान्यता दिली. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या अनेक कविता देशभर आपल्या भाषणातून पोहोचवल्या.पद्मश्री नाकारून हयातभर खऱ्या कवितेची पाठराखण ते करत आलेले आहेत.त्यांच्या 'खापा' या जन्मगावी साडेतीन एकरामध्ये नगरपालिकेने 'महाकवी सुधाकर गायधनी उद्यान' वसवलेले आहे.जिवंतपणी असा सन्मान होणे ही सुद्धा मराठी साहित्यातील एकमेव घटना आहे. सध्या ते नागपूरच्या सोमलवाडा या ठिकाणी वास्तवास असून त्यांचे 'महावाक्य','तुका अभंग मृदंग विठ्ठल','मृद्गंध आणि ओंजळ','योगिनींच्या स्वप्न्सावल्या',गोफणगोटा' इ.ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.लायब्ररी ऑफ कॉंग्रेस,वॉशिंग्टन यांनी 'एक्सलंट एपिक इन मराठी लिटरेचर ' म्हणून 'महावाक्य'चा सन्मान केला आहे.
-- संपादक,साहित्याक्षर
-- संपादक,साहित्याक्षर
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇 "कब्रीतला समाधिस्थ" कविता वाचल्या ही एका कविची लौकिकाकडून अलौकिकाकडे पाहण्याची अस्तित्ववादी धुनी आहे .गायधनींची स्व:ताला सोलताना लागलेली समाधी कबरीतुन उजागर होऊन शून्याच्या निर्व्याज्य पोकळीपर्यंत जाऊन पोहचते .स्व:तातील न्युनत्वाचा शोध घेताना ती शूद्रत्वाहून आकाशाकडे झेप घेते. ती फकिराची राख असल्याची ग्वाही देते तर अनंताच्या प्रवासाची साक्षी आहे.
वेगळ्या प्रतिमा, चिंतन, आणि तत्वज्ञानाची मोडतोड यांचा मिलाफ म्हणजे सुधाकर गायधनी यांची कविता. यात आपलेपण आहे .वेगळे चिंतन आणि नाविण्यपुर्ण आकृतीबंधामुळे कवितेला स्वता:चा चेहरा आहे. जो मराठी इतर कवींपेक्षा वेगळा आहे. कवितेची लय वेगळी आहे. सलग एक आशय कवितेतून व्यक्त होताना कविता आपले कविता पण सोडत नाही. ती दुर्बोधही होत नाही .सामान्यही होत नाही. तिच्यात आसक्ती आणि अनासक्ती यांचा जोरदार संघर्ष दिसून येतो. एका वेळी जीवनातील परस्पर विरोधी दोन गोष्टींचे आकर्षण असणे आणि विरोध असणे असा वेगळा संगम या कवीतेत दिसून येतो.व्यक्तीच्या ठिकाणी असणारे वितरागीपण ही जशी अधोरेखित करते .तशीच शुद्रत्वाने लुडबुडण्याची वृत्तीही सांगते.जीवनाविषयी गहन, गहीरा, भाव व्यक्त करताना ती तत्वज्ञानाच्या असिम पातळीवर वाचकाला नेऊन सोडते. त्याच्या मनात अर्थाची अनेक वलये निर्माण होतात. आपले हात तोकडे आहेत याची जाणीव त्याला होते. इथुन तिचा खरा प्रवास सुरु होतो .गायधनी ह्यांची कविता द्विपदरी आहे. ती एकावेळी आत्मकेंद्री आणि विश्वात्मक असा दोन्ही भाव घेऊन येते.तरीही ती स्वमग्नतेच्या पातळ्या ओलांडून आपले बाहू मानवतेला कवेत घेण्याची तयारी करते. तीला आपल्या सामर्थ्य आणि मर्यादांची जाणीव आहे. ही कविता प्रयोगशील नसुनही क्रिएटीव्ह आहे जी आपल्या जगण्याचा धागा सोडत नाही.इंद्रियसंवेद्य प्रतिमा येऊनही ती भावना चाळवणारी वाटत नाही.तिचे नक्की रंगरूप कोणते आहे या संभ्रमात वाचक पडतो .तिची जातकुळी वेगळी आहे. हिच्यात अध्यात्म आहे पण ते पारंपरिक नाही. कविने जीवनाविषयी केलेली अनेक विधाने जगण्याच्या व्याख्या करणारी आहेत.केवळ कवितेतुन बहुसंदर्भ देणे व पाडित्यप्रदर्शन करणे हे तिचे प्रयोजन नाही या उलट जगण्याचा नवा भाव,नवसुभाषितत्व रेखाटणे,स्वता;ला उलटेपालटेकरत जगण्याची धुनी रेखाटने इथे आहे .म्हणून ती मराठी कवितेत वेगळी ठरते. 🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇प्रा डॉ बाळासाहेब लबडे🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
गायधनींचा संपर्क : +91 98226 95736
या संग्रहातील निवडक कविता :
१.मी
माणसाच्या औलादीचा असूनही
मी लपता लपता
फाटक्या काफनातून दिसलो
कालपरवापर्यंत
गच्च आभाळ नेसून होतो
बारा होतो!
आज चार चौघांच्या खांद्यांसाठी
मुका होवून बसलो
जिंदगीचा हिसाब घेणाऱ्यानां
खुदा म्हणून फसलो .
***
२.धुनी
परमेश्वर वेषांतर करतो तर
मी साधूशी शरीरांतर केले म्हणून
कोण मला धुनिजवळ बांधून गेले?
मी तर धुंद धुनीचे सर्पण
ही आत्महत्या स्सामाजून
कोण धुनी विझवून गेले?
***
३.दान
दर्याखोर्यात
घुमणारे माझ्या हाकेचे
प्रतिध्वनी....
चिडून माझ्याच कानावर आदळता
माझी कर्णपटले फाटतात
मी बधीर होतो पूर्ण
आता बेफिकीरपणे हाक मारतोय
दूरस्थ अंध फकिराला
डोळ्यांचेही दान करण्यासाठी .
***
डॉ.संजय बोरुडे आणि महाकवी गायधनी ,कोरोडी (नागपूर) येथे
गायधनी स्वत:च्या स्मारकासमोर ,फोटो सौजन्य : डॉ.संजय बोरुडे

लेख आवडला, आणखी लेखन हवं होतं.
जवाब देंहटाएंधन्यवाद,प्लीज फॉलो द ब्लॉग
हटाएंअभिनंदन सर! मौलिक लेखनाचा परिचय.
जवाब देंहटाएंधन्यवाद,प्लीज फॉलो द ब्लॉग
हटाएंGaydhani sir mhanje marathitil legand yat vad nahi lekh apratim salam sir
हटाएंआदरणीय सर,
जवाब देंहटाएंमहाकवी सुधाकर गायधनी यांच्यावरील आपला लेख हा त्यांच्या लौकिकाला न्याय देणारा असा आहे. हा लेख मी संपूर्ण वाचला. आपण आपल्या लेखातून सुधाकर गायधनी यांच्या कवितेतील वेगळेपण आणि इतर वैशिष्ट्ये उत्तम प्रकारे अधोरेखित केली आहेत. आपण लिहिले आहे की-
वेगळे चिंतन आणि नाविण्यपुर्ण आकृतीबंधामुळे कवितेला स्वता:चा चेहरा आहे. जो मराठी इतर कवींपेक्षा वेगळा आहे. कवितेची लय वेगळी आहे. सलग एक आशय कवितेतून व्यक्त होताना कविता आपले कविता पण सोडत नाही. ती दुर्बोधही होत नाही .सामान्यही होत नाही. तिच्यात आसक्ती आणि अनासक्ती यांचा जोरदार संघर्ष दिसून येतो. एका वेळी जीवनातील परस्पर विरोधी दोन गोष्टींचे आकर्षण असणे आणि विरोध असणे असा वेगळा संगम या कवीतेत दिसून येतो.व्यक्तीच्या ठिकाणी असणारे वितरागीपण ही जशी अधोरेखित करते .तशीच शुद्रत्वाने लुडबुडण्याची वृत्तीही सांगते.जीवनाविषयी गहन, गहीरा, भाव व्यक्त करताना ती तत्वज्ञानाच्या असिम पातळीवर वाचकाला नेऊन सोडते. त्याच्या मनात अर्थाची अनेक वलये निर्माण होतात. आपले हात तोकडे आहेत याची जाणीव त्याला होते.
सुधाकर गायधनी यांच्या कविता या त्यांना महाकवी ही उपाधी देण्यास पुरेशा आहेत. एम.ए. अभ्यासक्रमासाठी स्वतःच्याच पुस्तकावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचे अति दुर्मिळ अहो भाग्य त्यांना लाभले. एखाद्या कवीच्या नावाने त्याच्या हयातीतच त्याच्या गावात उद्यान व्हावे ही गोष्ट विरळाच.एवढी मोठी योग्यता त्यांची निश्चितच आहे. सारे विश्व कवेत घेण्याचे सामर्थ्य असणाऱ्या सुधाकर गायधनी यांच्या कवितेचा परिचय करून देताना आपण अधून मधून उदाहरणादाखल काही कवितांच्या काही ओळी दिल्या असत्या तर माझ्यासारख्या अनेक वाचकांना आपण त्यांच्याविषयी जे लिहिले आहे याचा तिथल्यातिथे उलगडा झाला असता. कृपया आपण कि गोष्ट समजून घ्याल.माझा लिहिण्याचा हेतू हाच आहे की महाकवी सुधाकर गायधनी यांच्या समग्र कवितेचा आशय सांगितला हे आपल्या अभ्यासाने चिंतनातून आपल्याला शक्य झाले. पण सुधाकर गायधनी यांची एक कविता घेऊन तिचे यथायोग्य असे रसग्रहण केलेत तर त्याचा परिणाम अधिक चांगला असणार आहे. यामुळे महाकवी सुधाकर गायधनी यांची कविता आणि ते स्वतः असे दोघेही खऱ्या अर्थाने वाचकांपर्यंत पोहोचतील.
तीन कविता दिल्या आहेत

धन्यवाद सर,सविस्तर प्रतिक्रीयेबद्दल
जवाब देंहटाएंअप्रतिम लेख लबडे सर. https://youtu.be/Ap0qJyLE1I0
जवाब देंहटाएंhttps://youtu.be/Ap0qJyLE1I0
जवाब देंहटाएंगायधनी यांनी मराठा लाईव्हला दिलेली मुलाखत खालील लिंकवर पहा
जवाब देंहटाएंhttps://youtu.be/Ap0qJyLE1I0
मस्त लेख आहे
जवाब देंहटाएंधन्यवाद,प्लीज फॉलो द ब्लॉग
हटाएंअतिशय सुरेख लेख
जवाब देंहटाएंमहाकवि यांच्या महान साहित्यिक कार्याला योग्य न्याय दिलात
धन्यवाद,प्लीज फॉलो द ब्लॉग
हटाएंचांगला लेख
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंआदरणीय सुधाकर गायधनी सरांची कविता मराठीतली अक्षर कविता आहे. मायमराठीच्या महाकवीला मानाचा मुजरा - संजय चौधरी नाशिक
जवाब देंहटाएंधन्यवाद.आपले नाव का दिसत नाही?
हटाएंसुधाकर गायधनी एक महान कवी आहेत.
जवाब देंहटाएं